जंगलात लावणार फळझाडे, वन्यजीव-मनुष्य संघर्ष थांबवण्यासाठी पाऊल

जंगलात लावणार फळझाडे, वन्यजीव-मनुष्य संघर्ष थांबवण्यासाठी पाऊल

वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी नुकतीच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. बैठकीत कॅम्प, वन्य जीव, अर्थसंकल्प तरतुदी, संरक्षण, कांदळवन कक्ष, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ इत्यादी विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला.  वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जंगलात फळझाडे लावण्याची सूचना करण्यात आली.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला राज्याचे अपर मुख्य सचिव (वन) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमीता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वन संरक्षक संजीव गौर, इतर वरिष्ठ वनाधिकारी, क्षेत्रीय वन कर्मचारी, वन विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गणेश नाईक यांनी 1995 मध्ये वनमंत्री असताना जपानच्या सुमीटोमो कॉर्पोरेशनसोबत करार करून वृक्ष लागवड योजना व निधीबाबत करार केला होता. त्याच धर्तीवर इतर देशांतील यंत्रणांसोबत संपर्क साधत वन विभागासाठी नावीन्यपूर्ण प्रस्ताव तयार करून निधी उपलब्ध करण्याकरिता वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तयार करण्याच्या सूचना नाईक यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी त्यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्प (वन्य जीव) नागपूरच्या दिनदर्शिकेचे तसेच वन अधिकाऱ्यांच्या ‘सिव्हिल लिस्ट-2025’चे प्रकाशन करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला? पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला?
>> प्रभाकर पवार भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी ऊर्फ टायगर व प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे...
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळय़ात मस्क यांचा नाझी सॅल्यूट, सोशल मीडियावरून संताप
ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका, भुजबळांच्या जामिनाला दिलेले आव्हान फेटाळले
पालकमंत्र्यांची भूमिका काय? ग्रामस्थ अजित पवारांना भेटणार
मराठी सिक्युरिटी गार्डला मारहाण करणाऱ्या कंपनीला शिवसेनेचा दणका
बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांचा पुढाकार
पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवला, खलिस्तानी संघटनेचा दावा; मेलद्वारे स्वीकारली जबाबदारी