JPL – तुरुंगात रंगली जेल प्रीमियर लीग, कैद्यांनी लगावले चौकार आणि षटकार
इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू झाल्यापासून हिंदुस्थानातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये विविध प्रीमीयर लीग्स भरवण्यास सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये, कंपन्यांमध्ये, शाळांमध्ये आणि गावांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रीमियर लीग्सचे आयोजन केले जाते. परंतु उत्तर प्रदेशात चक्क तुरुंगामध्ये जेल प्रीमियर लीगचे (JPL) आयोजन करण्यात आले आहे. आज पासून या स्पर्धेला सुरुवात झाली असून कैद्यांनी पहिल्याच दिवशी चौकार आणि षटकारांचा आतषबाजी केली आहे.
नोएडामधील गौतम बुद्ध नगर जिल्हा कारागृहामध्ये जेल प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. कैद्यांमध्ये संघ भावना निर्माण व्हावी, त्यांचा फिटनेस चांगल राहावा आणि शिस्त या गोष्टींना चालणा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जेल प्रीमियर लीगमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिल्या दिवशी दोन सामने खेळवण्यात आले. पहिला सामना जेल सनराझर्सविरुद्ध जेल लायन्स असा रंगला. या सामन्यात जेल सनरायझर्स संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत विजयी सुरुवात केली. तर दुसरा सामना जेल फायटर्स आणि जेल डेअरडेव्हिल्स यांच्यात झाला. या सामन्यात जेल फायटर संघाने जेल डेअरडेव्हिल्स संघाचा पराभव केला.
“या स्पर्धेत कैद्यांनी पूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमुळे कारागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाच्या माध्यमातून कैद्यांमध्ये सांघिक कार्य, शिस्त आणि सहकाऱ्याची भावनी वाढीस लागते.” अशी माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List