‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. यामध्ये तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. मात्र आता अचानक तिने या मालिकेला रामराम केला आहे. या मालिकेत आता तेजश्रीच्या जागी दुसरी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीने अचानक ही मालिका का सोडली, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असतानाच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या तेजश्रीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

साडीमधील सुंदर फोटो पोस्ट करत तेजश्रीच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही.’ या कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये तिने लिहिलंय, ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

तेजश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘प्लीज प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडू नकोस. तुम्हा दोघांसाठी फक्त आम्ही ही मालिका बघत होतो. दुसऱ्या कोणाला सागरसोबत मुक्ता म्हणून पाहू शकत नाही. आम्ही प्रेक्षक मनापासून तुमचं काम पाहतो, तुमच्यावर प्रेम करतो. त्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘प्रेमाची गोष्ट या मालिकेची कथा आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. तुम्ही त्यातून बाहेर पडल्याचा निर्णय योग्यच घेतला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पण का’, असा सवालही काही नेटकऱ्यांनी तेजश्रीला केला आहे.

तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून बऱ्याच वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केलं होतं. ही मालिका सुरळीत सुरू होती. त्याचवेळी तेजश्री ‘तदेव लग्नम’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचं शूटिंग आणि चित्रपटाचं प्रमोशन या सर्व गोष्टी ती करत होती. मात्र अचानक तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं
ज्या महिलेची आकलन क्षमता कमी आहे तिला आई होण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी उपस्थित...
भाजपा प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खांद्यावर धुरा? स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोणते मिशन?
दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट; खळखळून हसवणाऱ्या ‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर
हंसिका मोटवानीच्या वहिनीने सासू, नणंद अन् पतीविरोधात दाखल केला FIR; नेमकं काय आहे प्रकरण?
उदित नारायण यांच्या इमारतीला आग, एकाने गमावले प्राण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
पुनर्वसनात पती-पत्नीला दोन घरे मिळणार नाहीत, हायकोर्टाचा निर्वाळा; स्वतंत्र झोपडीचा दावा फेटाळला
मुंबईत घर मिळण्याची गिरणी कामगारांची आशा पल्लवित, वरळीतील पाच एकरचा भूखंड महापालिकेकडेच राहणार