Saif Ali Khan Discharged : पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून आज मंगळवारी डिस्जार्ज मिळाला आहे. सैफ अली खानला रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना त्याच्यासोबत पत्नी करीना कपूरही दिसली. त्याच्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 16 जानेवारी रोजी हल्लेखोराने घरात घुसून सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्यावर सपासप सहा वार करण्यात आले होते.त्याच्या मणक्यामध्ये तीन इंचाचा धारदार तुकडा बाहेर काढण्यात आला होता. पाच दिवस त्याच्यावर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पाच दिवसाने त्याला रुग्णालयातून डिस्जार्ज मिळालेला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List