‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अधिपतीच्या आयुष्यात येणार नवं वादळ; अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वरी ही अक्षरा घराबाहेर राहत असल्याचं पुरेपूर फायदा घेत आहे. भुवनेश्वरी अधिपतीसमोर स्वतःची चांगली प्रतिमा बनवून ठेवण्यासाठी अक्षरासोबत बोलायला जाते आणि तिथून आल्यावर ती अक्षराने न बोललेल्या गोष्टी अधिपतीला सांगून भडकावते.
दुसरीकडे अक्षराला आई-बाबा समजावतात की तिने लवकरात लवकर अधिपतीला भेटून गरोदरपणाची बातमी द्यावी. त्यावर अक्षरा ठरवते की संक्रांतीच्या दिवशी स्वत: जाऊन अधिपतीला भेटायचं. ती अधिपतीसाठी छान गिफ्ट तयार करते.
अधिपतीने पण तिच्यासाठी छान साडी आणि हलव्याचे दागिने घेतले आहेत. दुर्गेश्वरी हे सर्व पाहून अधिपतीच्या साडीची पिशवी बदलते. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अक्षराला घरी घेऊन जायचं म्हणून अधिपती अक्षराच्या घरी येतो. पण घरात नेमकी इरा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List