हिरवा चुडा अन् मेहंदी..; त्या फोटोमुळे समृद्धी केळकरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

हिरवा चुडा अन् मेहंदी..; त्या फोटोमुळे समृद्धी केळकरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. समृद्धीच्या या फोटोवर मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनीही कमेंट करत उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘तारीख सेव्ह करून ठेवा’, ‘अखेर.. त्याची प्रतीक्षा करतोय’, ‘ओहो…’, ‘वाट पाहतोय’, ‘शुभेच्छा तुला’ असे असंख्य कमेंट्स समृद्धीच्या या फोटोवर येत आहेत. तिने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये समृद्धीच्या हातात हिरवा चुडा आणि मेहंदी पहायला मिळतेय. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये ‘कळवते लवकरच’ असं म्हटलंय. या सर्व गोष्टींमुळे समृद्धी लवकरच लग्नाची बातमी सांगणार की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काहींनी तिला आताच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

समृद्धीने गुपचूप लग्न उरकलं की काय, असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींनी हा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लढवलेली युक्ती असावी, असाही अंदाज व्यक्त केला आहे. हातातील हिरवा चुडा आणि मेहंदीचा नेमका अर्थ काय, हे तर आता समृद्धीच स्पष्ट करू शकेल. मात्र त्यासाठी चाहत्यांना समृद्धीच्या पुढच्या पोस्टची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन वर्षात अनेक कलाकार चाहत्यांना आनंदाची बातमी देत आहेत. काहींनी लग्न केलंय, तर काहींनी नवीन घर घेतलंय. काही सेलिब्रिटींनी नवी गाडी विकत घेतली आहे. अशातच समृद्धीची आनंदाची बातमी काय असेल, याची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by samruddhi kelkar (@samruddhi.kelkar)

अभिनयासोबतच समृद्धी नृत्यातही पारंगत आहे. 2017 मध्ये तिने ‘ढोलकीच्या तालावर’ या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. त्यात ती महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. तिच्या नृत्याने प्रेक्षकांचं आणि परीक्षकांचं लक्ष वेधलं होतं. ‘ढोलकीच्या तालावर’ या शोनंतर 2018 मध्ये समृद्धीला कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत पहिली संधी मिळाली. तर 2020 मध्ये तिने ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत किर्ती जामखेडची मुख्य भूमिका साकारली. याशिवाय समृद्धीने ‘दोन कटींग’ या लघुपटातही काम केलंय. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर समृद्धीचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले