Monalisa: महाकुंभातील सुंदरीचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 170k च्या पार
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभ (Mahakubh 2025) सोहळा सुरू आहे. दर 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा हा वेगवेगळे साधू, बाबा, धर्मगुरू यांच्यामुळे चर्चेत असतो. यंदा सोशल मीडियामुळे असंख्य वेगवेगळ्या कारणांनी महाकुंभ चर्चेत आहे. या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी एक सुंदर मुलगी चांगलीच व्हायरल झाली आहे. मात्र आता लोक तिच्यासोबत व्हिडीओ, फोटो शूट करण्यासाठी गर्दी करत असल्याने तिच्या वडिलांनी तिला इंदूरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स अवघ्या सात दिवसात 170k च्या पार गेले आहेत.
मोनालिसा भोसले (Monalisa Bhosle) असं या मुलीचं नाव असून गुगल यासर्च इंजिनसह अन्य सोशल मीडियावर मोनालिसा मोठ्या प्रमाणात सर्च होत आहे. मोनालिसाच्या नावानं अनेक सोशल मीडिया अकाउंट तयार झाले असून तिचे खरे अकाउंट कोणते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो आहे. एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसा मेकअप करत असताना त्या पार्लर मधील महिलेनं तिचे खरे अकाउंट कोणते आहे असा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या भावानं तिचं खरं अकाउंट व्हिडीओमध्ये दाखवलं आहे.
@monibhosale8 असं मोनालिसा हिचं इंस्टाग्रामवरील अकाउंट असल्याचं तो व्हिडीओमध्ये सांगतो. मोनालिसा सप्टेंबर 2024 मध्ये इंस्टाग्रामवर आली आणि महाकुंभामध्ये तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्या अवघ्या सात दिवसांत 1 लाख 70 हजारांच्या वर पोहोचली आहे. साऱ्यांचं लक्ष आता मोनालिसाच्या भवितव्याकडे लागलं आहे.
पाहा व्हिडीओ
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List