Badlapur Sexual Assault Case : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, जबाबदार पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे कोर्टाचे आदेश
बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. तो अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. ही चकमक खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदुक हिसकावून घेतली आणि गोळीबार केला असा दावा पोलिसांनी केला होता. पण या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच आढळले नाहीत असे तपासात निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी पाच पोलिसांनी दोषी ठरवण्यात आले आहे. या पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
ठाणे दंडाधिकाऱ्यांनी या संबंधीत अहवाल सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि नीला गोखले यांनी या अहवालाचे वाचन केले. बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षय शिंदेला ठाण्यात आणताना अक्षय शिंदेने पोलिसांचे पिस्तूल हिसकावले असा दावा पोलिसांनी केला. तसेच अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला असेही पोलिसांनी सांगितले. आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या असे पोलिसांनी म्हटले. पण जी पिस्तूल अक्षय शिंदेंने हिसकावले त्यावर त्याचे बोटाचे ठसे नव्हते असे फॉरेन्सिक चाचणीत निष्पण्ण झाले.
दुसरीकडे अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी ही चकमक खोटी असल्याचे म्हटले होते. अक्षयने पिस्तूल हिसकावली नाही, तो निःशस्त्र होता, त्याने पोलिसांवर हल्ला केलाच नाही असा दावाही अक्षयच्या कुटुंबीयांनी केला होता. जेव्हा ही चकमक झाली तेव्हा तत्कालीन मुख्यंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी पोलिसांची बाजू घेतली होती. तसेच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठीच गोळीबार केल्याचे म्हटले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List