दिल्ली संमेलनासाठी विशेष रेल्वे; पण तिप्पट तिकिटाचा बोजा, संयोजकांना सोसावा लागणार खर्चाचा भार

दिल्ली संमेलनासाठी विशेष रेल्वे; पण तिप्पट तिकिटाचा बोजा, संयोजकांना सोसावा लागणार खर्चाचा भार

दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेने प्रतिनिधींना नेण्यात येणार आहे. संमेलनाचे संयोजक असलेल्या सरहद संस्थेने रेल्वे मंत्रालयाकडे केलेली विशेष रेल्वे देण्याची मागणी मंजूर केली. मात्र ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटाच्या तीन पट आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत कोणालाही न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याने ही सवलत न मिळाल्यास दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी 1500 रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था व महामंडळाने घेतला आहे. संयोजकांना हा भार सोसावा लागणार आहे.

संमेलनासाठी दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी एका विशेष रेल्वेची संस्थेने मागणी केली होती. पुण्याचे पेंद्रीय मंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे रेल्वे मंत्रालयाने मंजूर झाली असल्याची माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिली. महाकुंब आणि इतर अडचणी असतानाही या संमेलनासाठी मंत्रालयाने ही रेल्वे मंजूर केली आहे.

z रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत देणार नाही. दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी 1500 रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था व महामंडळाने घेतला आहे. याशिवाय जादा येणारी ही रक्कम मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रायोजकाद्वारे अथवा हितचिंतकांकडून देणगीद्वारे जमा करण्याचे प्रयत्न आहेत. या परिस्थितीत रेल्वे अंतिम मान्यतेचे पत्र आल्यावर तातडीने एकूण रक्कम भरण्याचा निर्णय संयोजक संस्थेने घेतला आहे. ही नोंदणी सरहद कार्यालय आणि साहित्य परिषद कार्यालय येथे करता येईल.

z 17 डबे असलेली ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर क्लास आहे. ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारीला पुण्यातून निघेल आणि दि. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल. परतीचा प्रवास 23 फेब्रुवारी रोजी रात्री सुरू होईल. 24 तारखेला पुण्यात पोहोचेल. ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटाच्या तीन पट आहे. यामध्ये सवलत देण्याबाबत माजी पेंद्रीय मंत्री शरद पवार आणि पेंद्रीय मंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ हे आग्रही आहेत. त्यामुळे काही सवलत मिळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

..म्हणून तो चोर सैफच्याच घरात शिरला; पोलीस चौकशीत खुलासा ..म्हणून तो चोर सैफच्याच घरात शिरला; पोलीस चौकशीत खुलासा
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने...
‘लग्न नको, फक्त बेडवर पुरुष हवा..’; हे काय बोलून गेली तब्बू? बातम्या वाचून अभिनेत्री म्हणाली..
विकी कौशलचा ‘छावा’मधील अंगावर काटा आणणारा लूक; दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
‘प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला..’; कॅन्सरग्रस्त हिना खानवर अभिनेत्रीची टीका
Chhattisgarh Naxal Encounter – 36 तास चकमक, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटीचे बक्षीस असलेला चलपतीही ठार
दोन महिन्यांपूर्वी लग्न आता बनली महामंडलेश्वर
मोनालिसासाठी सौंदर्य ठरले शापित, महाकुंभातील व्हायरल सुंदरी परतली माघारी