रशियात वॉचमनच्या नोकरीसाठी गेले अन् युद्धात ढकलले, दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात काही हिंदुस्थानी ठार झाले. उत्तर प्रदेशातील 13 तरुण रशियाला गेले असता वॉचमनचे काम सांगून त्यांना युक्रेनविरोधात लढण्यासाठी वापरले गेले. याकैकी दोघांचा मृत्यू झाला, दोन जखमी झाल्याने मायदेशात परतले तर उर्वरित बेपत्ता आहेत. मृत तरुण आझमगड आणि मऊ जिह्यातील आहेत. या तरुणांना रशियामध्ये वॉचमन, कूक आणि मदतनीस म्हणून नेले होते.
प्रत्येकाला दोन लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते, मात्र वॉचमनच्या नावाखाली त्यांना युद्धभूमीवर पाठवण्यात आले. आझमगडचा कन्हैया यादव आणि मऊ जिह्यातील श्यामसुंदर यादव हे युद्धात कामी आले, तर राकेश यादव आणि ब्रिजेश यादव जखमी झाल्याने मायदेशी परतले. दरम्यान, विनोद यादव, योगेंद्र यादव, अरविंद यादव, रामचंद्र, अझरुद्दीन यादव, हुमेश्वर प्रसाद, दीपक आणि धीरेंद्र कुमार हे आठ जण कुठे आहेत याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List