… तर यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवत महायुती सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला. सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र अद्यापही जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले नसल्याने योजना बंद होते की काय अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या लाडकी बहिण योजनेच्या बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
जानेवारी महिना संपत आला तरी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मात्र गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.
‘लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जातील. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही घाई गडबडीत होतो. परंतु दोन दिवसांपूर्वीच 3 हजार 700 कोटी रुपयांचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेपासून बहिणींच्या अकाऊंटला पैसे येतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या महिलांचे महिन्याचे उत्पन्न 20 ते 21 हजारांपेक्षा अधिक आहे, त्या महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे सांगितले पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List