Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप

Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप

देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला पश्चिम बंगालच्या सियादलाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येसाठी आरोपी संजय रॉयला 18 जानेवारी रोजी बीएनएसच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. मागील वर्षी 9 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली. 10 ऑगस्टला रॉयला अटक झाली. कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय निवासी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. हॉस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला बलात्काराची शक्यता नाकारली. परंतु नंतर शवविच्छेदनात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

या खटल्याचे कामकाज 57 दिवसांमध्ये पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे याची सुनावणी इन-कॅमेरा झाली. सुरुवातीला या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत होते. नंतर सीबीआयकडे याचा तपास वर्ग करण्यात आला. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2024 रोजी याची सुनावणी सुरू झाली. 9 जानेवारी 2025 रोजी साक्षी पुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेक-अप, कर्ली हेअर; महाकुंभातील रुद्राक्ष विकणारी मोनालिसा थेट सेलिब्रिटी; मेकओव्हर पाहून ओळखणं कठीण मेक-अप, कर्ली हेअर; महाकुंभातील रुद्राक्ष विकणारी मोनालिसा थेट सेलिब्रिटी; मेकओव्हर पाहून ओळखणं कठीण
महाकुंभमध्ये अनेकजण चर्चेचा विषय बनताना पाहायला मिळत आहेत. मग त्यात साध्वी असो किंवा मग नागासाधू, प्रत्येकांची वेगळी वेगळी कहाणी आहे....
सहा ते दहा महिन्यांच्या मुलांच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, बाळाचा शारीरिक विकास होऊन वाढेल रोगप्रतिकारक शक्ती
बांगलादेशींची घुसखोरी हे भाजपचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका
दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर नियुक्ती
रोहित शर्मा रणजी खेळणार, मुंबईच्या संघात निवड; जम्मू कश्मीर विरूद्ध मैदानात उतरणार
हे सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे – आदित्य ठाकरे
पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी