पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश  

पालिका रुग्णालयांतील रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश  

मुंबईतील पालिकेची प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांतील असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून त्यातून गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. रिक्त पदांमुळे रुग्णालयातील कामाचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर आज पुन्हा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची दालनात भेट घेतली. या वेळी येत्या दोन महिन्यांत ही रिक्त पदे भरण्यात येतील, असे आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

मुंबईत असलेल्या पालिकेच्या मुख्य आणि उपनगरीय रुग्णालयांवर लाखो सर्वसामान्य लोक आरोग्य सुविधांसाठी अवलंबून आहेत. मात्र रुग्णालयांतील रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना योग्यरित्या आरोग्य सुविधा पुरवण्यात असमर्थता येते, ही बाब शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त शर्मा यांच्या निदर्शनाला आणून दिली. युनियनने उपस्थित केलेल्या रिक्त पदांबाबत आढावा घेऊन पदभरती करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश शिष्टमंडळासोबत उपस्थित असलेले उपायुक्त संजय कुऱहाडे यांना देण्यात आले. दरम्यान, रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासह इतर प्रश्नांसाठी लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन विपीन शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी सरचिटणीस सत्यवान जावकर, उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, रंजना नेवाळकर, चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, वृषाली परुळेकर, अजय राऊत, अतुल केरकर, महेश गुरव, संदीप तांबे, रामचंद्र लिंबारे उपस्थित होते.

तूर्त आंदोलन स्थगित 

मुख्य आणि उपनगरातील रुग्णालयांतील रिक्त जागांवरील भरती आणि इतर प्रश्नांबाबत 29 जानेवारीला युनियनने जाहीर केलेले रुग्णालयातील निदर्शने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वाल्मीक कराडच्या मुलासह साथीदारांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा! सोलापूर न्यायालयात तक्रार; आज होणार सुनावणी वाल्मीक कराडच्या मुलासह साथीदारांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करा! सोलापूर न्यायालयात तक्रार; आज होणार सुनावणी
लहान मुलीस मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर येथील...
पुण्यात भरदिवसा स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर बेछूट गोळीबार
तीन महिने गाडी चालवायची नाही; हायकोर्टाचे तरुणाला आदेश, लायसन्स नसताना हेल्मेट न घालता चालवली होती बाईक
जगज्जेतेपद खो-खोच्या दिग्गजांना अर्पण, हिंदुस्थानी कर्णधार प्रतीक वाईकरने व्यक्त केली कृतज्ञता
रशियात वॉचमनच्या नोकरीसाठी गेले अन् युद्धात ढकलले, दोन हिंदुस्थानी तरुणांचा  मृत्यू
मानापमान! शिंद्यांचे रुसू बाई रुसू… दऱ्यात जाऊन बसू; पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांमध्ये धुसफूस
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम