मानापमान! शिंद्यांचे रुसू बाई रुसू… दऱ्यात जाऊन बसू; पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांमध्ये धुसफूस

मानापमान! शिंद्यांचे रुसू बाई रुसू… दऱ्यात जाऊन बसू; पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांमध्ये धुसफूस

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मिंध्यांचे मानापमान नाटय़ दीड महिन्यांनंतरही सुरूच आहे. शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर शिंदे गटात पुन्हा एकदा नाराजी उफाळून आली. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद आपल्या समर्थकांना न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रुसले आणि दरे गावी जाऊन बसले आहेत. त्यातच मी बीडची लेक आहे. पालकमंत्री पद मिळाले असते तर आनंद झाला असता, असे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवल्याने महायुतीत पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांत सुरू असलेल्या धुसफुशीत अधिकच भर पडली आहे. मात्र या सगळय़ा मानापमान नाटय़ात बॅकस्टेजला वेगळेच नाटय़ रंगत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मिंधे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी भाजप नेतृत्वाकडे केली होती. मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर गृह, महसूल ही खाती देण्यात यावीत, अशी मागणी केली होती. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दोन्ही मागण्या धुडकावून लावल्याने अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदे सत्तास्थापनेच्या आधी नाराज होऊन अचानक साताऱयातील दरे गावी अचानक निघून गेले होते. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे आग्रही होते. मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी वर्णी लावण्यात आली. यामुळे नाराज झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक मंत्रालयातील नियोजित कामे सोडून तडकाफडकी साताऱयातील दरे गावी निघून गेले. यामुळे महायुतीमधील बेबनाव उघडकीस आला आहे.

एकनाथ शिंदे हा अस्वस्थ आत्मा – संजय राऊत

उपमुख्यमंत्री यांचे दरेगाव हे त्यांचा दावोस आहे. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी खरंतर नागा साधूंबरोबर पुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे. नागा साधू अस्वस्थ असतात आघोरी विद्या करत असतात, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या नाराजी नाटय़ावरून लगावला. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याची माहिती आहे. शिंदे सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी रुसले होते, तेव्हा ‘उदय’ होणार होता. पण शिंदे सावध झाले आणि झाकली मुठ सवा लाखाची. भविष्यात हे शिंदे गट, अजित पवार गटदेखील पह्डतील. पह्डापह्डी हेच त्यांचे जीवन आणि राजकारण असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.

फडणवीस दावोसवरून आल्यावर चर्चा – सुनील तटकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱयावर आहेत. त्यांची भेट ही राज्याच्या परकीय गुंतवणुकीच्या अनुषंगाने फायद्याची होईल. मात्र अशा वेळी राज्यात पालकमंत्री पदाचा प्रश्न उद्भवणं हे योग्य नाही. राजकारणात काही वेळेला काही गोष्टी घडत असतात. मात्र आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. विचारधारेशी बांधील आहोत. आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत विचाराची दिशा दिलेली आहे. फडणवीस दावोस दौऱयावरून आल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत योग्य ती चर्चा होईल, असे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

चर्चेतून मार्ग निघेल – चंद्रशेखर बावनकुळे

रायगड आणि नाशिक जिह्याच्या पालकमंत्री पदाच्या मुद्दय़ावरून कुठलीही नाराजी नाही. मी परवा आणि कालही एकनाथ ंिशदे यांना बोललो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारताबाहेर आहेत, नाहीतर कालच प्रश्न सुटला असता. पालकमंत्री पदांबाबत थोडी चर्चा करण्याची गरज आहे. मला वाटतं चर्चेतून मार्ग निघेल, असे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजप चालेल, पण तटकरे नकोत -महेंद्र थोरवे

महायुतीचं सरकार आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भरत गोगावले यांना पॅबिनेट मंत्री करण्यात आलं. जिह्यात तीन ंिशदे गट, तीन भाजप आणि एक अजित पवार गटाचा आमदार आहे. अशा वेळी ंिशदे गटाला पालकमंत्री पद मिळणे गरजेचे आहे. जर आम्हाला द्यायचे नसेल तर ते पद भाजपला दिले तरी चालेल, पण तटकरे नकोत, अशी भूमिका ंिशदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण तटकरे कुटुंबीयांचे नेतृत्व आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असे थोरवे म्हणाले.

बीडचे पालकमंत्री झाले तर आनंद -पंकजा मुंडे

मी बीडची लेक आहे. मला बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर आनंद झाला असता. मी पाच वर्षे बीडची पालकमंत्री होते. त्यावेळी बीडचा चांगला विकास झाला होता. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता, असे सांगत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्री पदावरून डावलल्याने नाराजी व्यक्त केली. बीडचे पालकमंत्री अजितदादा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

गावी आलो म्हणजे मी नाराज आहे असे नाही ः एकनाथ शिंदे

रायगडमध्ये भरत गोगावले यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी जिह्यात काम केले असेल तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय, असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंचे समर्थन केले. नाशिक आणि रायगडबाबत ज्या काही अडचणी आहेत त्यावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेऊ. गावी आलो म्हणजे मी नाराज आहे असे नाही. महाबळेश्वर येथील पर्यटन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी दरे गावात आल्याचे शिंदे म्हणाले.

रातोरात रायगड आणि नाशिक पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर करून दावोसला निघून गेले. मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटताच फडणवीस यांनी रविवारी रात्री परदेशातूनच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली.

सहपालकमंत्री हा काय नवीन प्रकार ते समजून घ्यावे लागेल ः मुश्रीफ

सहपालकमंत्र्यांची नवीन पद्धत आता आलेली आहे. सहपालकमंत्री हा काय प्रकार आहे, हे मुंबईला जाऊन समजून घेईन, असा उपरोधिक टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. गेली वीस वर्षे मी मंत्री आहे. यात केवळ 14 महिने कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. त्यामुळे कोल्हापूर जिह्यातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच असल्याचे ते म्हणाले. माझ्या भावना मी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्यात, असेही त्यांनी सांगितले.

थोडी तरी लाज बाळगा – आदित्य ठाकरे

नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आली. हे नक्की काय चाललंय? मंत्रिपद मिळवूनदेखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत. पालकमंत्री पद, बंगले यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा. एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे सगळं पैशांसाठी चाललंय – विजय वडेट्टीवार

ही सगळी परिस्थिती पाहून जनताच या सरकारला स्थगिती देईल. एवढे बहुमत असताना महायुतीत आपसात मतभेद टोकाला पोहोचले आहेत. सत्ता आणि पैसे मिळवण्यासाठी शरमेने मान खाली घालावी अशी स्पर्धा सुरू आहे. आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री, परवा उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, असे कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

बॅकस्टेजला रंगतेय वेगळेच नाटय़

एसटी बस खरेदीची चौकशी, बदलापूर एन्काऊंटरचा रिपोर्ट, स्ट्रीट फर्निचर कामाला स्थगिती, रस्त्यांच्या निविदा होल्डवर…

एकामागून एक हल्ल्यांमुळे मिंधे गटात अस्वस्थता

मिंधे गटाचे मंत्री असलेल्या खात्यांमधील घोटाळे, जिल्ह्यामधील वाढत्या गुन्ह्यांमुळे सत्तेत असूनही मिंधे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एसटी बस खरेदीची चौकशी, बदलापूर एन्काऊंटर रिपोर्ट, स्ट्रिट फर्निचरच्या कामाला स्थगिती आणि रस्त्यांच्या निविदेतील घोटाळा असे एकामागून एक हल्ले झाल्याने मिंधे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सत्ताधाऱयांकडूनच मिंधे गटाला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचेही बोलले जात आहे.

सरकारी बंगल्यांवरूनही धुसफूस

शासकीय निवासस्थानाच्या वाटपावरूनही मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. पंकजा मुंडे व जयकुमार रावल यांचा बंगला बदलण्याच्या निर्णयानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक यांचे निवासस्थानही बदलण्यात आले आहे. त्यांना मलबार हिलच्या अवंती 5 ऐवजी आता चर्चगेट येथील सुरुची 18 हे निवासस्थान देण्यात आले आहे.

लाडक्या बहिणीवर अन्याय

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्तीच रस्त्यावर जाळपोळ आणि निदर्शने करण्यासाठी लोक उतरवत आहे. ज्या राज्यात पालकमंत्री पदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही. पालकमंत्री पदावरून रायगडची आमची लाडकी बहीण आहे तिच्यावर अन्याय झालेला दिसतोय, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan attack : सैफच्या हल्लेखोराचे बांगलादेशात अनेक कॉल, हल्ल्यानंतर तो…  झोप उडवणारी धक्कादायक माहिती उघड Saif Ali Khan attack : सैफच्या हल्लेखोराचे बांगलादेशात अनेक कॉल, हल्ल्यानंतर तो… झोप उडवणारी धक्कादायक माहिती उघड
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील इमारतीतील घरात घुसून एका चोराने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सैफला...
MNS : दहीसरमध्ये दोन परप्रांतीय बाऊन्सर्सचा मराठी बोलण्यास नकार, पण मनसेने इंगा दाखवताच….
सोनाली बेंद्रेच्या ‘त्या’ 5 फोटोंवर असंख्या चाहते होते फिदा, 90 च्या दशकात होता अभिनेत्रीचा बोलबाला
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अधिपतीच्या आयुष्यात येणार नवं वादळ; अक्षराच्या जुन्या मित्राची एण्ट्री
सैफच्या घरी आरोपीला घेऊन पोहोचली मुंबई पोलीस; तासभर केला सीन रिक्रिएट
सुशांतच्या पाठीवर असलेला टॅटू होता अत्यंत खास, कोणासाठी अभिनेत्याने काढलेला टॅटू?
Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी तब्बल 2 तास… धक्कादायक माहिती आली समोर