पुण्यात गुईलेन सिंड्रोमचे टेन्शन, आत्तापर्यंत 22 संशयित रुग्ण आढळल्याने महापालिका सतर्क
HMPV सारख्या विषाणूचे देशात अनेक ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. अशातच आता एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. पुण्यात गुईलेन सिंड्रोम या आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. या संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी सध्या एनआयव्हीला पाठवण्यात आले आहेत.
HMPV नंतर आता गुईलेन सिंड्रोम या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. गुईलेन सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण आढळल्यामुळे पुणे महानगरपालिका देखील दक्ष झाली आहे. गुईलेन सिंड्रोम हा न्युरोलॉजिकल डिसऑर्डर असल्यामुळे याबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक नसल्याचे बोलले जात आहे.
गुईलेन सिंड्रोम म्हणजे नेमकं काय?
1. मिळालेल्या माहितीनुसार, गुईलेन सिंड्रोम हा नसांवर परिणाम करणारा आजार आहे. यामुळे स्थायू कमकुवत होतात.
2. स्नायू कमकुवत झाल्यामुळे वेदना होतात आणि संवेदना कमी होतात.
3. चेहरा, डोळा, छाती, शरिरातील, स्नायूंवर हा आजार परिणाम करतो. या आजारामुळे तात्पुरता अर्धांगवायु आणि श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते.
4. हाताची बोटं, पाय यामध्ये वेदना, चालताना समस्या येणे, चिडचिड होणे, चेहऱ्यावर कमजोरी ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List