मुंबई गोदीतून होणारी बेकायदा वाहतूक रोखा, ऑनलाइन दंड हटवा; महाराष्ट्र वाहतूक सेनेचा चक्का जाम करण्याचा इशारा
मुंबई पोर्ट ट्रस्ट अर्थात मुंबई गोदीमध्ये देशविदेशामधील जहाजांमधून रोज लाखो टन माल येतो. हा माल गोदीबाहेर नेताना त्याची काही बेकायदेशीर ट्रक टेम्पोमधून वाहतूक होत आहे. अशा बेकायदेशीर वाहनांना, वाहतुकीचे नियम न पाळणा-या वाहनांना रोखा, जुलमी ऑनलाइन दंड बंद करा, त्याचबरोबर टोलमध्ये सुट मिळावा. सरकारने याबाबत तोडगा काढला नाही तर शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको करून चक्का जाम करण्यात येई, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी दिला आहे.
मुंबईतील वाहतूकदारांच्या विविध समस्यांकडे पोलीस तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई गोदीच्या प्रवेशद्वारावर शेकडो वाहतुकदारांनी उदय दळवी यांच्या नेतृत्वाखाली केले. दळवी म्हणाले, मुंबई गोदीतून ओव्हरलोड, ओडिसी, लो बेड वाहनांतून बेकायदेशीर वाहतूक वाढलेली आहे. या अवैध वाहतुकीमुळे रस्त्यांचे नुकसान व अपघातांची शक्यता वाढलेली आहे. त्यात वाहतूकदार हे पोलीस यंत्रणेच्या जुलमी ऑनलाइन दंडामुळे बेजार झालेले आहेत. वाहतूक व्यवसायातून मिळणाऱ्या भाडयापेक्षा ऑनलाइन दंडाची रक्कम ही मोठी आहे. यामुळे हा व्यवसाय बंद करण्याच्या मनःस्थितीपर्यंत वाहतूकदार येऊन पोहोचले आहेत. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्याध्यक्ष अशोक टाव्हरे, उपाध्यक्ष फारूक काझी, साईकुमार माळोदे, गिरीश विचारे, विद्याधर पाटील, बाबुराव मोरे, दिनकर कांबळे. चिटणीस, जयंत शिंगरे, विलास कामोटकर, दीपक सोनावणे, धर्मेश राठोड, महेश गुरव यांच्यासह पदाधिकारी, वाहतूकदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List