मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर उद्यापासून तीन दिवस वाहतूक ब्लॉक
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गर्डर अर्थात तुळई बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 22 जानेवारी, बुधवारपासून ते 24 जानेवारीपर्यंत दुपारी 12 ते 3 या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असून ती इतर मार्गांवर वळवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील किमी क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथे पूल बांधण्यात येत आहे. त्या पुलाची तुळई बसविण्यात येणार आहे. हे काम 22 ते 24 जानेवारीदरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत केले जाणार आहे. त्यासाठी तीन तासांचा वाहतूक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे. तीन तासांच्या वाहतूक ब्लॉकदरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक महामार्गाच्या पुणे वाहिनीवरील किमी क्र. 54/700 वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List