नराधम अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बोगस, खोट्या चकमकीला पोलीस जबाबदार; चौकशी समितीचा ठपका

नराधम अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बोगस, खोट्या चकमकीला पोलीस जबाबदार; चौकशी समितीचा ठपका

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर हा बोगस असल्याचे दंडाधिकाऱयांच्या अहवालावरून उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाने आज पोलिसांच्या बेकायदेशीर कृतीचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. घटना घडली तेव्हा पोलीस परिस्थिती सहज हाताळू शकले असते; परंतु अधिकाऱयांनी तसे केले नाही. याउलट अधिक बळाचा वापर करून आरोपीचा थेट एन्काऊंटर केला. या बोगस एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार असल्याचे ताशेरे ओढत या प्रकरणी दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने सरकारला दिले.

बदलापुरात लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी मुख्य तक्रारदाराकडून अॅड. अजिंक्य गायकवाड, अॅड. कविशा खन्ना यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठासमोर अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरबाबत दंडाधिकारी अशोक शेंडगे यांनी केलेला तपास अहवाल सादर करण्यात आला. दंडाधिकाऱयांच्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आले असून पोलिसांकडून हिसकावत वापरलेल्या पिस्तुलावर अक्षय शिंदे याच्या बोटांचे ठसे नव्हते असे अहवालात दंडाधिकाऱयांनी म्हटले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या तपासातसुद्धा हे निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला याबाबत जाब विचारला.

खंडपीठाने या प्रकरणी कोण तपास करणार त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी सरकारी वकील हितेन व्हेनेगावकर यांनी सीआयडी तपास करणार असल्याची माहिती दिली. खंडपीठाने सुनावणी 5 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

संजय शिंदे वादग्रस्त अधिकारी

अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करणारे ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त अशीच आहे. 1992पासून मुंबईच्या पोलीस दलात ते अनेक वर्षं क्राईम ब्रँचमध्ये होते. वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. 1998-2000च्या काळात मुंबईत गँगवॉर मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. त्या वेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील परदेशात असलेल्या हस्तकांसोबत संजय शिंदे यांचे पह्न कॉल्सद्वारे संभाषण झाले होते. हे संभाषण वरिष्ठ अधिकाऱयांनी ऐकले होते. एका उद्योगपतीला धमकावून खंडणी वसूल करण्यात आली होती त्या वेळी शिंदे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, पोलिसांची प्रतिमा डागाळू नये म्हणून शिंदे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय रद्द केला.

राजकीय फायद्यासाठी हत्या केली का? – संजय राऊत

विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली होती का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. हे एन्काऊंटर झाले तेव्हा फडणवीस गृहमंत्री होते. त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी आमची माहिती आहे, असे नमूद करतानाच समितीच्या अहवालानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार का, असा सवाल राऊत यांनी केला.

पोलिसांचे दावे ठरले खोटे

पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदे शिवीगाळ करत होता. तो अचानक निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचू लागला. या झटापटीत रिव्हॉल्वरमधून उडालेली गोळी मोरे यांच्या पायाला लागली. याच वेळी अक्षयने रिव्हॉल्वरचा ताबा घेऊन फायर केले. आणखी गोळी झाडण्याच्या तयारीत असतानाच संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली, अशी पोलिसांनी रंगवून सांगितलेली गोष्ट खोटी ठरली.

पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर घडवून आणल्याचे सत्य आधीच सांगितले होते

बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा भाजपशी संबधित होती. त्यामुळे संस्था चालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काऊंटर करण्यात आल्याचा खळबळनजक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आरोपी शिंदेने स्वतŠवर गोळ्या झाडून घेतल्या नाही तर त्याला पोलिसांनी मारले, हे आपण आधीच सांगितले होते, असा दावाही देशमुख यांनी केला. पोलिसांच्याजवळ असलेले रिवॉल्व्हर काढून कोणी गोळ्या झाडू शकत नाही. ते लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आपण केली होती. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिकाऱयाच्या निष्कर्षावरून दिसते, असेही देशमुख म्हणाले.

पोलिसांएवढेच शिंदे-फडणवीस जबाबदार -वडेट्टीवार

या एन्काउंटरची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तेवढीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ‘एकनाथचा एक न्याय’ आणि ‘देवाभाऊचा न्याय’ म्हणून स्वतःला हीरो बनवून घेण्यासाठी या एन्काउंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे, अशी तोफ त्यांनी डागली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

..म्हणून तो चोर सैफच्याच घरात शिरला; पोलीस चौकशीत खुलासा ..म्हणून तो चोर सैफच्याच घरात शिरला; पोलीस चौकशीत खुलासा
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने...
‘लग्न नको, फक्त बेडवर पुरुष हवा..’; हे काय बोलून गेली तब्बू? बातम्या वाचून अभिनेत्री म्हणाली..
विकी कौशलचा ‘छावा’मधील अंगावर काटा आणणारा लूक; दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत
‘प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला..’; कॅन्सरग्रस्त हिना खानवर अभिनेत्रीची टीका
Chhattisgarh Naxal Encounter – 36 तास चकमक, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 कोटीचे बक्षीस असलेला चलपतीही ठार
दोन महिन्यांपूर्वी लग्न आता बनली महामंडलेश्वर
मोनालिसासाठी सौंदर्य ठरले शापित, महाकुंभातील व्हायरल सुंदरी परतली माघारी