मुख्यमंत्री पदापासून मंत्रीमंडळ विस्तार ते पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत, संजय राऊत यांचा टोला
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पालकमंत्रीपदाच्या यादीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्रीपदाच्या स्थगितीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना राज्य सरकारला फटकारले आहे.
“सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलं आहे. 15-20 दिवसात प्रत्येक सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. मुख्यमंत्री पदापासून मंत्रीमंडळ विस्तारापर्यंत पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत. एक दिवस कुणाचा तरी मोठा गेम वाजणार आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी पालकमंत्रीपदावरील वादावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, इतका हतबल मुख्यमंत्री मी पाहिलेला नाही. महाराष्ट्रात प्रथमच मी हे चित्र पाहिलं की पालकमंत्री पदासाठी एक मंत्री जाळपोळ करतोय. रायगड महाड येथे त्याचे समर्थक रस्त्यावर उतरलेयत, हिंसाचार घडवला जातोय. तसंच याहून गंभीर म्हणजे हिंसाचार घडवला म्हणून आता पालकमंत्रीपद बदललं जातंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List