जर कोरोनाप्रमाणे HMPV व्हायरस पसरला तर, आरोगतज्ज्ञांनी सांगितला उपाय
चीनमधून HMPV व्हायरस पसरतोय. कोरोनासारखा हा विषाणू असला तरी तो कोरोनाइतका घातक नाही अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. तसेच कोरोनासारखा हा विषाणू पसरला तर याचीही साथ पसरू शकते असेही भोंडवे म्हणाले.
2020 च्या जानेवारीमध्ये कोरोना नावाचा व्हायरस आला होता. या व्हायरची कोट्यवधी लोकांना लागण झाली, लाखो लोक या व्हायरसमुळे मृत पावले. आता चीनमध्ये HMPV नावाचा व्हायरस पसरला आहे आणि त्यामुळे लोक आजारी पडत आहेत. पण हा विषाणू नवीन नाही, हा विषाणू युरोपमध्येही पसरला होता. हा विषाणू कोविडसारखा असला तरी कोविडच्या गटातला नाही. या विषाणूची लागण झाल्यावर कोरोनाइतका त्रास होत नाही. या विषाणूची लागण झाल्यास त्याचा मृत्यूदरही कमी आहे.
या विषाणूची लागण झाल्यास शिंका, खोकला, नाकातून पाणी येणे, घसा खवखवणे, ताप येणे अशी लक्षणं आहेत. हा आजार वाढला तर न्युमोनिया होण्याचीही शक्यता आहे. ऑक्सिजन कमी होऊ श्वास घ्यायला त्रास होतो.
असले तरी हा विषाणू इतका धोकादायक नाही. विश्रांती आणि योग्य उपचार घेतल्यास पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो. कोरोनासारखा हा विषाणू पसरला तर याचीही साथ पसरू शकते. या आजारावर कुठलेही औषध नाही पण यावर लस येण्याची शक्यता आहे. या विषाणूला फार घाबरण्याची गरज नाही, याचे प्रतिबंध उपाय कोरोनासारखेच आहेत. मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे आणि अंतर ठेवणे तसेच साबणाने आणि सॅनिटायझरने हात नेहमी धुवावेत. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List