मुद्दा – अशांत मणिपूर ‘शांत’ व्हावा

मुद्दा – अशांत मणिपूर ‘शांत’ व्हावा

>> अनंत बोरसे

वर्षाच्या  सुरुवातीलाच ईशान्य भारतातून चांगली बातमी आली, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना नववर्षात सुबुद्धी सुचली. मणिपूरमधील जनतेची माफी मागितली हे चांगले संकेत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मणिपूरमधील हिंसाचाराने धुसमुसत आहे. आजवर जवळपास 250 जणांचे जीव गेले आहेत आणि करोडो रुपयांची हानी झाली आहे. मणिपूरमधील हिंसाचारासाठी कारण ठरले ते तेथील हायकोर्टाने मोठ्या प्रमाणावर असलेल्या मैतेई समाजाला इतर जातींप्रमाणे एसटीचा दर्जा देता येईल का? यासंबंधी अभ्यास करण्याचे आदेश मणिपूर सरकारला दिले आणि यावरून कुकी, नागा या आदिवासी आणि एसटी जातींच्या लोकांमधून मोठी प्रतिक्रिया आली आणि त्याची परिणती मैतेई विरुद्ध इतर जाती यांच्या संघर्षात झाली.

मणिपूर तसेच ईशान्य भारतातील सातही राज्ये ही अतिशय संवेदनशील भूभाग आहे. देशाच्या दृष्टीने हा भाग अशांत राहणे ही देशासाठी चिंतेची बाब आहे. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून स्थानिक मैतेयी आणि कुकी या दोन जमातींमधे संघर्षाची ठिणगी पडली. वेळीच वातावरण शांत करण्याऐवजी तेथील राज्य सरकारने एका समाजाची बाजू घेत आगीत तेल ओतले. मणिपूरमधील एका सेवानिवृत्त सैनिकाच्या पत्नीची काही समाजकंटकांनी भरदिवसा नग्नावस्थेत धिंड काढली आणि तिच्यावर माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करत ठार केले याची चित्रफीत जगासमोर आल्याने ‘मणिपूर फाईल्स’चे वास्तव किती भयानक आहे याचे चित्रण देशाने पाहिले. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार. मात्र तरीदेखील मणिपूर आजही धगधगत आहे. गृहमंत्री अमित शहा हे अधूनमधून काही तरी प्रयत्न करताना दिसतात. राहुल गांधी हेदेखील मणिपूरमध्ये जाऊन आले होते. सुप्रीम कोर्टानेदेखील मणिपूर हिंसाचाराची गांभीर्याने दखल घेत सरकार काही करणार नसेल तर आम्ही पावले उचलू, असा इशारा दिला होता. मणिपूर हे ईशान्य भारतातील संवेदनशील राज्य आहे. ईशान्य भारत कायमच धुसमुसत असतो. यात जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ईशान्य भागात कायमच अशांतता आणि हिंसाचार होत आला आहे.

देश आज कठीण परिस्थितीतून जात आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, विद्वेष, आर्थिक संकट अशी अनेक आव्हाने उभी ठाकली असताना ईशान्य भारत आणि विशेषतः अशांत मणिपूर ही देशासाठी चिंतेची बाब आहे. हिंसाचाराची फार मोठी किंमत देशाने आजवर चुकवली आहे हे लक्षात घेऊन राजकारण, श्रेयवाद, तु-तु-मै-मै या पलीकडे जाऊन सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास करून मणिपूर शांत करायला हवा आणि तेच देशाच्या हिताचे आहे. चला नववर्षात का होईना, देर आये दुरुस्त आये. किमान आता तरी मणिपूर शांत होण्यासाठी प्रामाणिक इच्छाशक्ती आणि मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले