सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन, देशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित

सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन, देशमुख व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य राहणार उपस्थित

सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड मराठा समाजाचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने बुधवार 22 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर येथील समन्वयक रवी मोहिते यांनी दिली. या मोर्चास मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह देशमुख व सूर्यवंशी यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, कुर्दूवाडीचे संजय टाणपे, संभाजी ब्रिगेडचे दीपक वाडदेकर, किरण घाडगे, स्वराज पक्षाचे महादेव तळेकर, किरण भोसले, दिगंबर सुडके, विनोद लटके, महेश पवार, आकाश पवार, बंटी भोसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहेच, परंतु परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीत हत्याच केली असल्याचा आरोप रवी मोहिते यांनी केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी तसेच यातून आरोपींची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती तर दीपक वाडदेकर यांन दिली.

दरम्यान, सदर मोर्चा बुधवार 22 रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, दीपक केदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुजरातचा मोठा डाव, महाराष्ट्रानं उधळला, अनेक दिवसांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार गुजरातचा मोठा डाव, महाराष्ट्रानं उधळला, अनेक दिवसांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदूरबारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निमित्तानं गुजरात राज्यातील वन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गुजरात राज्यातून...
हल्लेखोराचं टार्गेट तैमूर नव्हे ही व्यक्ती… त्या रात्री काय काय घडलं? एफआयआरमध्ये काय आहे?; वाचा संपूर्ण डिटेल्स
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी कुठे-कुठे गेला? सर्व CCTV फुटेज समोर, पाहा Inside स्टोरी
ऐश्वर्या रायचे ‘ते’ 30 वर्ष जुने 5 फोटो, अभिनेत्रीने 21 व्या वर्षी जिंकलं भारतीयांचं मन
आरोपी जेहच्या बेडजवळ आला आणि…, मदतनीस एलियामाचा जबाब, धक्कादायक माहिती समोर
केसांची निगा राखण्यासाठी घरीच तयार करा हर्बल शाम्पू, जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची पद्धत आणि फायदे
जेवल्यानंतर का होते गोड खाण्याची इच्छा? जाणून घ्या काय आहे कारण