शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलन; 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निषेध

शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलन; 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निषेध

वादग्रस्त नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गास जनतेचा विरोध असतानाही, निवडणुकीनंतर महायुती सरकारची भूमिका बदलली आहे. महाराष्ट्र सरकारने शपथविधी आटोपल्यानंतर युद्धपातळीवर शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी व सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी दि. 24 जानेवारी रोजी या 12 जिल्ह्यांतून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानुसार शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यांतून शेतकरी हे आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

शक्तिपीठ महामार्ग बाधित 12 पैकी दहा जिल्ह्यांतील आंदोलनाच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक आज सायंकाळी झाली. यामध्ये सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली.

याबाबत संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फॉडे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील महायुती सरकार हे खोटे पसरवून निवडून आले आहे. या निवडणुकीनंतर देखील शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी ते या महामार्गास फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, इतर जिल्ह्यांतून विरोध नसल्याचा खोटा नरेटिव्ह वापरत आहेत. इतर जिल्ह्यांत सुद्धा या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू असल्याचे सर्वांना माहीत आहे. अजूनही लढा सुरू आहे. या सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिज संपत्ती लुटीसाठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट असताना एक-दोन दिवसांत या महामार्गाच्या प्रस्तावास कशी मंजुरी देते. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला तसेच पर्यावरण विरोधी शेतकरी विरोधी व जनविरोधी शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी जर शासन जिद्दीस पेटले असेल तर शेतकरीदेखील छातीचा कोट करून घाव झेलून लढायला तयार आहे.

नांदेडचे गोविंद घाटोळ म्हणाले, ‘मराठवाडामधील सर्व जिल्हे संघर्ष समितीने पिंजून काढू, शेतकऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या या अन्यायकारक भूसंपादनाची प्रक्रिया सांगून, शेतकऱ्यास लढण्यास सज्ज बनवू.’
लातूरचे गजेंद्र येळकर म्हणाले, ‘स्वतः महायुतीतील अनेक आमदार व खासदार या शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनात उतरले असून, त्यांनीही भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने मांडली आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याच आमदार, खासदारांचे ऐकत नाही. हे सरकार काही कारभारी मंडळींकडून अदानी अंबानींसाठी चालवले जाते.

या बैठकीस गिरीश फोंडे, गोविंद घाटोळ, गजेंद्र येळकर, सतीश कुलकर्णी, शांतिभूषण कच्छवे, विजयराव बेले, शिवराज राऊत, विठ्ठलराव गरुड, लालासाहेब शिंदे, अभिजीत देशमुख, गणेश घोडके, सुभाष मोरलवार, गजानन तीमेवार, केतन सारंग, भारत महाजन, सुदर्शन पडवळ, संभाजी फरताळे, अनिल बेळे, केदारनाथ बिडवे, श्रीधर माने, संतोष व्याळे, सतीश घाडगे, सुनील भोसले, मेहताब पठाण, रवी मगर, परमेश्वर मोठे, बसवराज झुंजारे, नानासाहेब चव्हाण, रामेश्वर चव्हाण, उमेश एडके, प्रकाश पाटील, केदारनाथ बिडवे, गणेश माने, सुरेश राजापूरकर, नवघरे बाबुळगावकर हे विविध जिल्ह्याचे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पडताळणी पूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली...
पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?
सैफचा हल्लेखोर कसा सापडणार? पोलीस आपसातच भांडतायत, क्राइम ब्रांचचा वांद्रे पोलिसांवर काय आरोप?
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब, ‘दागिने समोरच ठेवले पण…’
Saif Ali Khan Attack : अब्बूंवरील हल्ल्याने हादरला, सैफच्या लेकाने घेतला मोठा निर्णय
Saif Ali Khan : 5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
उद्योगनगरीत उद्योजकांकडे खंडणी मागण्याच्या घटना; दोन वर्षांत खंडणीचे 11 गुन्हे दाखल