SSC HSC Exams 2025 – दहावी, बारावी परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार आहेत. मागील वर्षाच्या वेळापत्रकानुसार या वर्षाच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. आधीच्या वेळापत्रकात दहावी, बारावीचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला येतील, असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे सर्व पुण्यातील शिक्षण विभागांच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान शिक्षण विभागाच्या नऊ विभागीय मंडळांमध्ये होणाऱ्या या परीक्षांना सुमारे 31 लाख विद्यार्थी बसणार आहेत. शिक्षण विभागातर्फे 20 ते 26 जानेवारी 2025 दरम्यान सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जागरूकता मोहीम सुरू करण्यात येणार आहे. “आम्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शिक्षण विभाग त्यावर लक्ष केंद्रीत करत आहे,” असे शालेय शिक्षण मंत्री म्हणाले.
तसेच, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागात बारावीची परिक्षा फेब्रुवारी 11 ते 18 मार्च दरम्यान होतील आणि दहावीची परीक्षा फेब्रुवारी 21 ते 17 मार्च दरम्यान होणार आहेत. सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे. आणि राष्ट्रगीतानंतर दररोज महाराष्ट्र राज्य गीताचे पठण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच “शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकेतर जबाबदाऱ्या कमी करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List