कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण- नराधम विशाल गवळीचे तिघे भाऊ ठाणे, पालघर, रायगडातून तडीपार
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निघृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याच्या तीनही भावांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. अक्षय गवळी, शाम गवळी व नवनाथ गवळी अशी या तिघा भावांची नावे असून डीसीपी अतुल झेंडे यांनी हा तडाखा दिला आहे. तिन्ही भावांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.
नराधम विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान विशाल गवळी व त्याच्या तीनही भावांविरोधात दहशत माजवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, महिलांची छेडछाड यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांनाही ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून तडीपार करत सातारा जिल्ह्यात सोडले आहे. दोन वर्षांकरिता ही तडीपारी करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेत गुंडगिरी करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांची यादी कोळसेवाडी पोलिसांनी तयार केली आहे. लवकरच या सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी व तडीपारीची कारवाई करण्यात येईल. – अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List