नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधू-भगिनी पालकमंत्री नको! ध्वजारोहण करू देणार नाही; सकल मराठा समाजाचा इशारा
आम्हाला नांदेडचा बीड करायचा नाही. त्यामुळे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आमच्याकडे पालकमंत्री नकोत, अशी स्पष्ट भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. नांदेडकरांचा विरोध डावलून मुंडे बंधू-भगिनीला पालकमंत्री केल्यास येत्या 26 जानेवारीला त्यांना ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ नांदेड येथे शनिवार, 18 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आरोपींना अटक करून ‘मकोका’ लावण्यात आल्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अवादा कंपनीचा एक कामगार केजमध्ये चांदणी बारसमोर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाईत गोळीबार
व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटल्याची घटना ताजी असताना अंबाजोगाईमध्ये आज पुन्हा खळबळजनक घटना घडली. दोघांच्या कौटुंबिक वादातून तरुणाने आपल्याजवळील असलेल्या अवैध कट्टय़ातून घरात घुसून गोळी झाडली. मात्र निशाणा चुकल्याने सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. या घटनेने बीड जिह्यात विनापरवाना शस्त्र असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
बीडमध्ये दोन भावांना मारून रस्त्यावर फेकले, तिसरा गंभीर जखमी
बीडमध्ये माणसाच्या जिवाची पिंमत मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अतिशय अमानुष पद्धतीने हाल हाल करून मारण्यात आले. आता आष्टीत जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघा भावांना मारून रस्त्यावर फेकून देण्यात आले. तिसरा भाऊ गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फरार असताना वाल्मीकचे देवदर्शन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा फरार असताना दिंडोरीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने दुसऱ्यांदा मदत नाकारली
अगोदर न्याय द्या, सोमनाथचा बळी घेणाऱ्या अपराध्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत विजया सूर्यवंशी यांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेला दहा लाखांचा धनादेश घेऊन आलेले अधिकारी आल्यापावली परतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List