सैफने जहांगीरला हल्लेखोरापासून वाचवलं, करीना कपूरची पोलिसांना माहिती
हल्लेखोर जेव्हा घरात घुसला होता तेव्हा तो खुप आक्रमक होता अशी माहिती सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने दिली. तसेच सैफने जहांगीरला हल्लेखोरापासून वाचवलं
करीना कपूरने पोलिसांना माहिती दिली की, हल्लेखोर हा आधी जहांगीरच्या रूममध्ये होता, तेव्हा घरातल्या कामवाल्या बाईने त्याला पाहिलं आणि आरडाओरड केली. तेव्हा सैफने जहांगीरच्या रूमकडे धाव घेतली. सैफने जहांगीरला आणि मोलकरणीला हल्लेखोराने वाचवलं.
सैफ अली खान आणि त्यांचे कुटुंबीय सतगुरु सहारन बिल्डिंगच्या 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर राहतात. या हल्ल्यात सैफवर हल्लेखोराने सहा वार केले. दुसरीकडे हल्लेखोराने दागिन्यांनाह हातही लावला नाही असे करीनाने सांगितले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबीय हादरून गेले, त्यानंतर करीश्माने करीनाला तिच्या घरी नेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List