Parner news – हल्ल्यात चिमुकली ठार; बिबट्या जेरबंद

Parner news – हल्ल्यात चिमुकली ठार; बिबट्या जेरबंद

पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील एका शेतामधील मक्यच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने लघुशंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (16 रोजी) सायंकाळी घडली. दरम्यान, या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याच्या पथकांना आज यश आले.

शुक्रवारी सकाळी खडकवाडी येथील भातुंबरेवस्तीजवळील झुडपांमध्ये बिबट्या लपून बसला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शरद रहाणे यांना दिली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी रहाणे यांनी वन खात्याच्या जुन्नर व संगमनेर येथील पथकांना पाचारण केले. कर्मचाऱ्यांनी झुडपांभोवती जाळे पसरले. त्यावेळी जमलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने सैरभैर झालेला बिबट्या झुडपांमधून बाहेर येऊन पळू लागताच पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जाळ्यात जेरबंद केले. बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येऊन पिंजऱ्यात डांबले. पाच ते सहा वर्षे वयाचा हा नर बिबट्या असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला माळशेज घाटातील वनक्षेत्रात सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वन विभागाच्या टाकळी ढोकेश्वर येथील कार्यालयात बिबट्याच्या वावराबाबत वारंवार केलेल्या तक्रारींकडे, तसेच पिंजरा लावण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच खडकवाडी येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. वन खात्याच्या गलथान कारभारावर खडकवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती समजल्यानंतर खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते यांनी वनक्षेत्रपाल अनिल राहणे यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करून संबंधितांना भरपाई देण्याच्या सूचना दिल्या.

वन विभागाकडून आर्थिक मदत

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ईश्वरीच्या कुटुंबीयांना वन विभागाच्या वतीने १० लाखांची मदत तातडीने देण्यात आली. उर्वरित १५ लाख रुपये मुदत ठेवीच्या रूपाने बँकेत ठेवण्यात येणार असल्याचे सुजित झावरे, दीपक लंके यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पडताळणी पूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली...
पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?
सैफचा हल्लेखोर कसा सापडणार? पोलीस आपसातच भांडतायत, क्राइम ब्रांचचा वांद्रे पोलिसांवर काय आरोप?
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब, ‘दागिने समोरच ठेवले पण…’
Saif Ali Khan Attack : अब्बूंवरील हल्ल्याने हादरला, सैफच्या लेकाने घेतला मोठा निर्णय
Saif Ali Khan : 5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
उद्योगनगरीत उद्योजकांकडे खंडणी मागण्याच्या घटना; दोन वर्षांत खंडणीचे 11 गुन्हे दाखल