Saif Ali Khan Attack – कपडे बदलले, हेडफोन खरेदी केले; सैफवर हल्ला करणारा संशयित दादरमधील सीसीटीव्हीत कैद
सैफ अली खान याच्यावर हल्ला होऊन 48 तास उलटले तरी अद्याप पोलिसांचे हात हल्लेखोरापर्यंत पोहोचलेले नाही. मुंबई पोलिसांचे 30 पथकं हल्लेखोराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे, पण खरा हल्लेखोर मोकाटच आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोराने कपडे बदलले आणि त्यानंतर दादरमध्ये हेडफोनची खरेदीही केली, असेही आता समोर आले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सैफवर 6 वार केले. यात गंभीर दुखापत झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून एक-दोन दिवसात त्याला डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित दादरमधील सीसीटीव्हीत कैद #SaifAliKhan #SaifAliKhanAttacked pic.twitter.com/lhhJHRJMq9
— Saamana Online (@SaamanaOnline) January 18, 2025
दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने कपडे बदलल्याचे उघड झाले आहे. तसेच दादर येथील एका मोबाईल दुकानामध्ये हल्लेखोराने हेडफोन खरेदी केले. त्यानंतर तात्काळ लोकल किंवा एक्सप्रेस गाडी पकडून मुंबईतून पळ काढला असावा किंवा उपनगरामध्ये लपला असावा अशी शक्यता आहे.
हा संशयित हल्लेखोर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. तो वारंवार कपडे बदलत असून क्राइम वेब सिरिज किंवा चित्रपटाचा प्रभाव त्याच्यावर असावा अशी शंकाही पोलिसांनी व्यक्त केली. तसेच हल्लेखोर सराईत गुन्हेगार नसावा, अशीही शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List