Kho Kho Worldcup -बांगलादेशचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश,

Kho Kho Worldcup -बांगलादेशचा धुव्वा उडवत हिंदुस्थानी महिलांचा उपांत्य फेरीत प्रवेश,

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पराभव केला. हिंदुस्थानी संघाची कर्णधार प्रियांका इंगळेने जबरदस्त खेळ केला, तिला रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिली. हिंदुस्थानसाठी हा विजय खूप मोलाचा होता. आता उपांत्यफेरीत फेरीत द. आफ्रीकेविरुध्द लढत होणार आहे.

हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना हिंदुस्थानने 50 गुणांची कमाई केली. तर संरक्षणात 6 ड्रीम रन मिळवत मध्यंतराला 56-08 अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत हिंदुस्थानने बांगलादेशचा 109-16 असा 93 गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सामन्याचा आढावा:

दुसऱ्या टर्नमध्ये हिंदुस्थानी संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेशमा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल 5 मिनिटे 36 सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये 6 गुण जोडले.
तिसऱ्या टर्नमध्ये हिंदुस्थानने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेशमा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर 106-8 असा होता.

शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. हिंदुस्थानी संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना 109-16 अशा निर्णायक फरकाने जिंकला.

सामन्यातील पुरस्कार:
सामन्याचा सर्वोत्तम आक्रमक: मगई माझी ( हिंदुस्थान)
सामन्याचा सर्वोत्तम बचावपटू: ऋतुराणी सेन (बांगलादेश )
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: अश्विनी शिंदे (हिंदुस्थान)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मराठी भाषिकांच्या न्यायासाठी दावा ताकदीने लढावा, सीमाबांधवांचा टाहो; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मराठी भाषिकांच्या न्यायासाठी दावा ताकदीने लढावा, सीमाबांधवांचा टाहो; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
गेल्या 68 वर्षांपासून महाराष्ट्र सीमेवरील 864 मराठी भाषिक गावांतील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने...
नारायणगाव येथे भीषण अपघात; नऊजण मृत्युमुखी, पाच जखमी
मुंबई गुन्हे शाखेचा दरारा संपला, खबऱ्यांचे नेटवर्क तकलादू
सैफवर हल्ला करणारा अजूनही मोकाटच, 30हून अधिक पथके घेताहेत शोध
दक्षिण मध्य मुंबईत आजपासून सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सव, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
धनंजय मुंडेंना कृषी साहित्य खरेदीतील गोलमाल भोवणार, दोन आठवडय़ांत स्पष्टीकरण देण्याचे हायकोर्टाचे आदेश
तब्बल 14 वर्षांनी सिंहाच्या गुहेत पाळणा हलला, बोरिवलीच्या नॅशनल पार्कात ‘मानसी’ने दिला गोंडस बछड्याला जन्म