Saif Ali Khan : 5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नवाबांच्या कुटूंबातून येतो. आज वारसा हक्काने आलेली त्याच्याकडे 5 हजार कोटींची संपत्ती आहे. त्याशिवाय त्याचा स्वत:चा ‘हाऊस ऑफ पटौदी’ नावाचा ब्रांड आहे. 2018 साली त्याने हा व्यवसाय सुरु केला. सैफ अली खानची स्वत:ची 1300 कोटींची संपत्ती आहे. सैफकडे आज प्रचंड पैसा, आलिशान घर, Cars आहेत. पण याच सैफ अली खानवर घटस्फोटानंतर अमृता सिंहला पोटगीची रक्कम देताना चांगलेच नाकीनऊ आलेले. 1991 साली सैफ अली खानने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंह बरोबर लग्न केलं. अमृता सिंहपासून त्याला दोन मुलं आहेत. सारा अली खान (1995) आणि इब्राहिम अली खान (2001). लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ अली खान आणि अमृता सिंहने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
या घटस्फोटामुळे सैफ अली खानच व्यक्तीगत आयुष्य ढवळून निघालं होतं. पोटगीपोटी त्याला प्रचंड रक्कम द्यावी लागली होती. 2005 साली टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सैफने अनेक गोष्टींचा खुलासा केलेला. “मला अमृताला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यातले 2.5 कोटी रुपये मी दिले आहेत. त्याशिवाय माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत मला महिन्याला 1 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. मी शाहरुख खान नाहीय. माझ्याकडे तितका पैसा नाहीय. मी सर्व पैसे देईन असा मी तिला शब्द दिलाय आणि मी देईन” असं सैफने या मुलाखतीत सांगितलेलं.
‘अमृता माझ्या आयुष्याचा भाग राहील’
अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ कंगाल झाला होता. त्याच्याकडे जे काही होतं ते त्यांना मुलांना आणि अमृताला देऊन टाकलेलं. इतकं सगळं होऊनही अमृता माझ्या आयुष्याचा भाग राहील असं सैफ अली खान म्हणालेला. “जाहीराती, स्टेज शो आणि चित्रपटांमधून जो पैसा मिळायचा तो सगळ मुलांना देत होता. माझ्याकडे पैसा नाहीय. माझा बंगला अमृता आणि मुलांसाठी होता. मला तिच्याबद्दल काही तक्रार नाहीय. पण ती आणि मुलं माझ्या आयुष्याचा भाग राहतील. माझ्या मुलांनी आणि तिने आनंदी रहावं एवढीच माझी इच्छा आहे” असं सैफ या मुलाखतीत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List