नवीन वर्षात ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये रंजक ट्विस्ट; प्रेक्षकही खुश!
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक वळण आलं आहे. नवीन वर्षात या मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत.
अमोल आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या आठवणींचा संग्रह एका स्क्रॅपबुकमध्ये जपून ठेवतो. ज्यामुळे अप्पी आणि अर्जुन भावूक होतात. अमोल आपल्या जीव वाचवल्याबद्दल गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि आभार मानतो.
अप्पीने रुग्णालयातील फसव्या नोकरीच्या प्रथांचा तपास करण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण होतो. अमोलची तब्येत हळूहळू सुधारतेय आणि कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतायत.
अमोल पेपरमध्ये संकल्पचा फोटो पाहतो, ज्यामुळे एक नवीन गूढ निर्माण होतं. अमोल आपल्या आजारात मदत करणाऱ्या सगळ्यांचे, कुटुंब आणि वैद्यकीय टीमचे, आभार मानण्याचा निर्णय घेतो. कुटुंब अप्पीच्या सत्कार सोहळ्याची तयारी करत असतानाच, संकल्पच्या भूमिकेबद्दल अमोलला सत्य सांगण्याची चिंता सतावते.
सत्कार सोहळ्यात अप्पी तिच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबाच्या समर्थनाबद्दल मनापासून आभार मानते. अनपेक्षितपणे, गायतोंडे अमोलला त्याच्या खंबीरपणाबद्दल दुसरा सन्मान जाहीर करतो. अमोल मंचावर जातो आणि आपल्या पालकांबद्दल, डॉक्टरांबद्दल, आणि कुटुंबाबद्दल मनोगत व्यक्त करतो. त्याचं भाषण सर्वांना भावतं.
अमोलला कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या आजाराशी लढण्याच्या धैर्याबद्दल सन्मान केला जातो, तर अप्पीला घरच्या अडचणी असूनही तिची जबाबदारी चोख बजावल्याबद्दल कौतुक होत. सोहळ्यात अमोल त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो आणि माणिक (संकल्प) याचा उल्लेख करतो, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो.
बापू आणि विनायक अमोलला संकल्पबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेतात. मात्र, अमोलच्या नाजूक प्रकृतीची काळजी घेऊन अप्पीआणि अर्जुन याला विरोध करतात. सत्कार सोहळ्याचे फोटो स्क्रॅपबुकमध्ये लावताना, अमोलला नवीन वर्षाचा संकल्प लिहायची कल्पना येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List