बॉलीवूडची ही अभिनेत्री सौंदर्यासाठी रोज दुधाने अंघोळ करते? स्वत:चं सांगितलं सौंदर्याचं रहस्य
बॉलिवूडचा एक नवीन चेहरा बनलेली आणि सेलिब्रिटींची खास मैत्रिण असलेली अभिनेत्री शालिनी पासी तिच्या संपत्तीसाठी ओळखली जाते. भारतातील श्रीमंत उद्योगपतीची पत्नी म्हणूनही शालिनीला ओळखलं जातं.
सध्या सोशल मीडियावर शालिनी पासीचे नाव आणि फोटो सतत येत आहेत. तसेच नेटफ्लिक्सचा हिट रिॲलिटी शो ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’मध्येही शालिनी पासी चाहत्यांची लाडकी बनली.
शालिनी रोज दुधाने आंघोळ करते ?
शालिनीही फक्त तिच्या संपत्तीसाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अनेकांनी असा दावा केला होता की ती आपले सौंदर्य जपण्यासाठी चक्क दुधीने अंघोळ करते. याबाबत शालिनीला एका मुलाखतीत विचारण्यातही आलं.
तेव्हा बोलताना शालिनी म्हणाली की, ‘मी दुधाने आंघोळ करते हे खरं नाहीये. मला समजावून सांगावे लागू नये म्हणून मी शोमध्ये जे काही विचारले होते त्याला हो म्हणायचे. मला इतर कलाकार सदस्यांना काहीही समजावून सांगायचे नव्हते. किंवा काहीही स्पष्ट करायचे नव्हते”
“गाय, घोडे आणि बकरे पाळण्याची परवानगी नाही”
शालिनीने तिच्या उत्तरामधून हे स्पष्ट केले की तिने या अफवेला हो म्हटंल असेल तरी ते शोमध्ये कोणालाही तिच्या कोणत्याही सवयींबद्दल सविस्तरपणे सांगत बसावे लागू नये म्हणून तिने तेव्हा उत्तर देणे टाळल्याचं म्हटलं आहे.
शालिनीने पुढे म्हटलं,”‘मी ज्या भागात राहते, तिथे आम्हाला गाय, घोडे आणि बकरे पाळण्याची परवानगी नाही. हा नियम आहे. मी दुधाने आंघोळ करत नाही” असं म्हणतं तिने रोज दुधाने अंघोळ करत असल्याची चर्चा ही केवळ अफवाच असल्याचं म्हटलं आहे.
शालिनीचे खरे ब्युटी सिक्रेट
दरम्यान शालिनी पासीने तिच्या ब्युटी सीक्रेटबद्दल शालिनीने सांगितले होते की ती केस निरोगी ठेवण्यासाठी रीठा, शिककाई यासारख्या गोष्टी वापरते. तर रोज सकाळी तूपाचे शॉर्ट्स पिते.
तुपामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. वास्तविक, तुपामध्ये ब्युटीरिक ऍसिड आढळते, जे चरबी कमी करण्यास मदत करते. पण हे ही लक्षात ठेवा की वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना , जास्त प्रमाणात तुपाचे सेवन करू नये, अन्यथा ते हानिकारक होऊ शकतं. त्यामुळे हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List