Aishwarya Rai-Abhishek Bachchan : चला, चला.. ऐश्वर्या मराठीत बोलते तेव्हा; अभिषेकसोबत झाली स्पॉट
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काही आलबेल नाही, अशा चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. ते दोघे वेगळे राहतात, लवकरच घटस्फोट घेणार, घरातल्या वादामुळे त्यांच्यात दुरावा.. एक ना अनेक, अशा बऱ्याच अफवा अनेक महिन्यांपासून सातत्याने फिरत असून त्यामुळे त्यांचे चाहतेही चिंतेत होतं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात तर अभिषेक हा संपूर्ण बच्चन कुटुंबासह दिसला आणि ऐश्वर्या मात्र तिच्या लेकीसह बऱ्याच वेळाने आली. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आणखीनच चर्चा सुरू झाली. मात्र बच्चन कुटुंब, अभिषेक किंवा ऐश्वर्या कोणीच त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र अनेक कार्यक्रमांना ते वेगवेगळे हजेरी लावायचे.
पण गेल्या काही दिवसात अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा एकत्र दिसू लागले, आधी एका लग्नात ते वृंदा राय यांच्यासोबत दिसले, अभिनेत्री आयेशा झुल्काने त्यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केला, तो खूप व्हायरलही झाला. , तर त्यानंतर आराध्याच्या शाळेच्या फंक्शनसाठी त्यांनी बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबतही हजेरी लावली. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील काळजी मिटली आणि ते पुन्हा खुश झाले.
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच खुशखबर
हे कमी की काय म्हणून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाही ते दोघं पुन्हा एकत्र दिसल्याने चाहते आनंदात आहे. देशाबाहेर न्यू ईयर सेलिब्रेशन करत अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा मुंबईत परतले असून ते नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत लाडकी लेक आराध्यादेखील होती. तिघेही काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसले. आई-वडिलांसोबत असल्यामुळे आराध्याही खुश दिसली, तिने सुहास्य वदनाने सर्वच फोटोग्राफर्सना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
ऐश्वर्या मराठीत बोलते तेव्हा..
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ऐश्वर्या-आराध्या, अभिषेक हे तिघेही एअरपोर्टबाहेर पडताना दिसले. त्यांच्या कारच्या दिशेने जाताना नेहमीप्रमाणेच फोटोग्राफर्सनी त्यांना गराडा घातला होता. त्यावेळी ऐश्वर्याने लेकीला सांभाळून पुढे पाठवलं आणि त्यानंतर ती चक्क मराठीत बोलली. आराध्यामागे चालत असताना ऐश्वर्याने थेट मराठीत ‘चला, चला’ असं म्हटलं आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देती ती लेकीमागे जाऊन कारमध्ये बसली. अभिषेक बच्चनही त्यांच्यासोबतच होता. दोघींना कारमध्ये नीट बसवल्यानंतर त्यानेही सर्व फोटोग्राफर्सना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच कारमध्ये पुढे बसून ते तिघेही घराच्या दिशेने रवाना झाले. वूम्प्ला या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांचे एकत्र बाँडिंग पाहून चाहतेही खुश असून अनेकांनी त्यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List