तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक

तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमैया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या प्रकरणात तहसीलदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली.

एका तरतुदीचा घेतला फायदा

किरीट सोमैया यांनी सांगितले की, नोव्हेंबर 2023 मध्ये संसदेने ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली. परंतु या तरतुदीमुळे महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत बांगलादेशी आणि रोहिंग यांना भारतातील जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. त्यासाठी काही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरील जे एजंट आहे त्यांच्यासोबत एक षडयंत्र बनवले. त्यानुसार एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना जन्म प्रमाणपत्र देण्याबाबत विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे असे अर्ज आलेले आहे

असे वाटले जन्म प्रमाणपत्र

किरीट सोमैया म्हणाले, गेल्या एक महिन्यात मी महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यात फिरलो. मालेगाव एक छोटा तालुका आहे. मात्र त्या ठिकाणी 4200 अर्ज आले. त्यानंतर पुण्याची लोकसंख्या 45 लाख आणि 60 लोकांना प्रमाणपत्र दिले आहे. त्यानंतर मुंबईची लोकसंख्या दोन कोटी तिथे 58 लोकांना प्रमाणपत्र दिले आहे. या जन्म प्रमाणपत्रामुळे त्यांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. यामुळे हा विषय आता मी भारत सरकारकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार आहे.

राज्यभरात जन्म प्रमाणपत्रासाठी एक लाख अर्ज आलेले आहेत. त्यासाठी बोगस दस्तावेज तयार केले आहेत. त्या प्रत्येक अर्जाची छाननी करून या बांगलादेशी रोहिंग यांना एका झटक्यात बाहेर काढला पाहिजे. मालेगाव येथील रजिस्टरमध्ये फक्त 1106 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात 4 हजार 200 जणांना जन्मप्रमाणपत्र दिले. यामध्ये एक माजी आमदार एक विद्यमान आमदार आणि एक खासदाराने माझ्या विरोधात रान उठवला आहे. हे भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही.

आता हा सर्व प्रकार उघड

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे सगळे बाहेर आले आहे. विदेशी लोकांना इथे घेऊन येणे आणि वोट बँक वाढवणे त्याला देशद्रोही समजा. त्यामुळे आज मी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. मालेगावच्या तहसीलदाराविरोधात सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच तहसीलदारांना जे पाठिंबा देणारे राजकीय नेते आहेत त्यांनाही सुद्धा यामध्ये घ्या, अशी मागणी आपली आहे, असे किरीट सोमैया यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले