हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, लोकलचं वेळापत्रक कोलमडलं
मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. याचा मोठा फटका हा चाकरमान्यांना बसला आहे. दुपारच्या शिफ्टसाठी घरातून बाहरे पडलेल्या नोकरदार वर्गाला ऑफीसला जाण्यासाठी विलंब होत आहे, तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर मार्गावरील लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. ठाणे आणि वाशिकडे जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावत आहेत. रेल्वे गाड्या उशिरानं धावत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रक विस्कळीत
समोर आलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावर तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे लोकला गाड्या उशिरानं धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. ठाणे आणि वाशिकडे जाणाऱ्या ट्रेनला विलंब होत आहे. लोकलची वाहतूक धिम्यागतीनं सुरू असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. अचानक निर्माण झालेल्या या तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांचा देखील गोंधळ उडाला असून, नोकरदार वर्गाला कामावर जायला उशिर होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर
हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, ट्रेन 15 ते 20 मिनिट उशिरानं धावत आहेत. हार्बर मार्गावर तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. तात्रिंक बिघाडाचा मोठा फटका हा लोकल ट्रेन वाहतुकीला बसला आहे. दरम्यान आता तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी रुळावर उतरून तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना पाहायला मिळत आहे. लवकरच वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना फटका
वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरानं सुरू असल्याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसल्याचं पाहायला मिळत आहे. कामावर निघालेले चाकरमानी मध्येच अडकले आहेत. रेल्वे स्टेशनवर देखील गर्दी वाढल्याचं चित्र आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List