संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग?

संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग?

मंत्रि‍पदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केलं जाणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी लागलीच आमदारांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे.

कॅबिनेट असतानाही अध्यक्ष पदाचा मोह

कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही संजय शिरसाट हे अध्यक्षपदावर कायम होते. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ते यापूर्वी शिंदे गटाची हिरारीने बाजू मांडत होते. पण अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागली नव्हती. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्यांना सिडको अध्यक्ष पद देण्यात आले होते.

अखेर अध्यक्ष पदावरून हटवले

मंत्रीपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता.

ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांना पदावरून मुक्त करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते. गुरूवारी शासन निर्णयात शिरसाट यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील 202 कलमान्वये प्रदान अधिकाराआधारे शिरसाट यांची मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांना पदमुक्त करत असल्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.

अध्यक्ष पदासाठी आमदारांमध्ये लॉबिंग

भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केलं जाणार असल्याचे समोर येत आहे. इतर ही महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान लवकरच आता नवीन सिडको अध्यक्षाची निवड केली जाईल. सिडकोचे अध्यक्षपदासाठीही आता मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले आहे. नवी मुंबईतील आमदार आणि इतरांनी या पदासाठी फिल्डिंग लावल्याचे समजते. आता सिडकोचे अध्यक्ष पद कुणाला मिळते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सिडकोचा तांत्रिक कारभार सुधारावा. नागरिकांच्या जलदगतीने सोडवाव्यात आणि ऑनलाईन पद्धतीने कारभार करावा. लीज होल्डसंदर्भात अनुरूप निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सिडको वसाहतीतील नागरीक करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक तहसीलदार अन् त्या राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…मालेगावातील या गंभीर प्रकरणाबाबत किरीट सोमैया आक्रमक
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमैया आक्रमक झाल्या...
Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली! लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
Saif Ali Khan Attack : हल्लेखोर पोलिसांनी असा हुडकून काढला? हे तंत्रज्ञान धावले मदतीला, तुम्हाला माहिती आहे का?
सरकारने दखल घेतली नाही, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची मागणी
Chhatrapati Sambhajinagar News- रेल्वे इंजिनवर चढलेल्या तरुणाने विजेच्या तारेला पकडलं, गंभीर भाजला
महाराष्ट्र सरकार, ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही का? मुनगंटीवारांचा खरमरीत सवाल
Mahakumbh Mela 2025 – पाप लागेल तुम्हाला…, साध्वी हर्षा रिछारियाला रडू कोसळलं; कुंभमेळा सोडणार