मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक ?
मध्य रेल्वेवर आज ( शुक्रवार) आणि रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी आज, 17 जानेवारी शुक्रवार आणि रविवार, 19 जानेवारी रोजी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही काळासाठी उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. याची नोंद घेऊन मुंबईकरांनी आज आणि रविवार, असे दोन्ही दिवस आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कसं असेल वेळापत्रक ?
मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. आज अर्थात शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोलीदरम्यान,तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत.
शुक्रवार, 17 जानेवारी रोजी दुपारी 1.50 ते 3.35 या दरम्यान ब्लॉक असेल. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल दिशेकडे क्रॉसओवरसह) ते चौक, भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) अप आणि डाउन लाइन दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे.
तर रविवार, 19 जानेवारी रोजी दुपारी 11.20 ते 1.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक, भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाउन लाइनवर ब्लॉक असेल, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबईकरांनी बाहेर पडण्यापूर्वी याची नोंद घ्यावी, तसेच त्याप्रमाणे आपला प्रवासा आखावा असे आवाहन रेल्वे विभागतर्फे करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List