Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण….
बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. काल त्याच्यावर घरातच जीवघेणा हल्ला झाला. सुदैवाने सैफ या हल्ल्यातून बचावला. सैफवर सध्या वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरात घुसलेल्या चोराने सैफवर हा हल्ला केला. सैफ अली खानवर काल दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पाच ते सहा तास या शस्त्रक्रिया सुरु होत्या. त्यावरुन हा हल्ला किती गंभीर होता हे लक्षात येतं. चोराने सैफ अली खानला भोसकलं. त्याच्या शरीरावर सहा जखमा झाल्या. त्यात पाठिच्या कण्याला झालेली जखम गंभीर होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. सैफच्या पाठितून एक टोकदार चाकूचा तुकडा बाहेर काढला. सैफच्या प्रकृतीला आता कुठलाही धोका नाहीय. पुढच्या दोन-तीन दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
या हल्ल्यानंतर सैफ अली खानच कुटुंब, त्याची मुलं, आगामी सिनेमे त्याची संपत्ती, बिझनेस याची चर्चा सुरु झाली आहे. सैफ अली खान हा नवाबांच्या कुटुंबातून येतो. पतौडी कुटुंबातील सैफ अली खान हा 10 वा नवाब आहे. रिपोर्टनुसार, हरियाणा येथील पतौडी पॅलेस आणि भोपाळ येथील संपत्ती मिळून त्याच्याकडे तब्बल 5 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्याशिवाय सैफचा ‘हाऊस ऑफ पटौदी’ नावाचा ब्रांड आहे. 2018 साली त्याने हा व्यवसाय सुरु केला. देशातील वेगवेगळ्या शहरात त्याने दुकानं उघडण्यास सुरुवात केली. सैफच्या स्वत:च्या नावावर आज 1300 कोटीची संपत्ती आहे.
सैफची दोन लग्न
सैफ अली खानने दोन लग्न केली. पहिली पत्नी अमृता सिंह सोबत घटस्फोट झालाय. तिच्यापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. करीनासोबत दुसरं लग्न केलं. त्या लग्नापासून तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.
का संपत्तीची वाटणी करता येणार नाही?
वारसा हक्काने सैफ अली खानकडे आलेली संपत्ती 5 हजार कोटींच्या घरात आहे. पण तो या संपत्तीची त्याच्या चार मुलांमध्ये वाटणी करु शकत नाही. कारण त्याची ही संपत्ती Enemy Dispute Act 1968 अंतर्गत येते. या कायद्यातंर्गत कोणीही त्या प्रॉपर्टीवर अधिकार सांगू शकत नाही. जे लोक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी किंवा 1965 आणि 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानात निघून गेले. तिथले नागरिक बनले. त्यांची सर्व अचल संपत्ती ‘एनिमी डिस्प्यूट प्रॉपर्टी’ म्हणून घोषित केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List