Saif Ali Khan याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कोणाला बसणार मोठा फटका, होणार कोट्यवधींचं नुकसान?
Saif Ali Khan: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे. सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोराने सैफवर जोरदार सहा वार केले आहेत. अभिनेता गंभीर जखमी झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पण सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठं नुकसान होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान लवकरच एक दोन नाही तर आठ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार होता. पण अचानक भयानक हल्ला झाल्यामुळे अभिनेत्याला काही काळ ब्रेक घ्यावा लागणार आहे. ज्यामुळे सिनेमाच्या शुटिंगच्या वेळापत्रकात मोठे बदल होतील. ज्यामुळे निर्मात्यांचं कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हल्ला होण्यापूर्वी सैफ ‘ज्वेल थीफ : द रेड सन चॅप्टर’ सिनेमाचं शुटिंग करत होता. आता अभिनेत्याची प्रकृती पाहता दिग्दर्शकाने सिनेमाची शुटिंग काही काळासाठी रद्द केली आहे. ‘ज्वेल थीफ : द रेड सन चॅप्टर’ सिनेमा शिवाय सैफ अली खान ‘रेस 4’, ‘स्पिरिट’, ‘देवरा: पार्ट 1’, ‘देवरा: पार्ट 2’ सिनेमात देखील दिसणार आहे.
सैफ अली खान याने अन्य प्रोजेक्ट देखील साईन केले आहे. तामीळ दिग्दर्शक बालाजी मोहन दिग्दर्शित ‘क्लिक शंकर’ सिनेमात देखील सैफ झळकणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट एट बायकुला’ सिनेमात देखील सैफ दिसणार आहे. एवढंच नाही तर, लेक सारा अली खान हिच्यासोबत देखील सैफ पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे. हल्ल्यानंतर मुलगा इब्राहिम अली खान याने वडिलांना रिक्षातून लीलावतीत दाखल केले आहे. यानंतर सैफ याच्यावर तातडीने शस्रक्रिया करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक वार सैफ अली खान याच्या मणक्यात लागला असून त्याने त्यांच्या स्पायनल कॉर्डला धक्का बसून गंभीर जखम झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List