एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार

एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार

देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत.  कार कंपन्या आता बजेट फ्रेंडली ईव्हीवर काम करत आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक कार अधिकाधिक लोकांच्या खिशाला परवडू शकेल. देशी-विदेशी कार कंपन्या कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारवर काम करत आहेत.

यातच लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार हिंदुस्थानात टेस्ट दरम्यान दिसली आहे. युरोपियन मॉडेलवर आधारित, ही 2-सीटर मिनी EV एका चार्जवर 63 किमी ते 192 किमी पर्यंत रेंजसह वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार देशात 1 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते.  असं झाल्यास ही देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरू शकते.

बॅटरी आणि रेंज

Ligier Mini EV हिंदुस्थानी बाजारपेठेत G.OOD, I.DEAL, E.PIC आणि R.EBEL या 4 प्रकारांमध्ये ऑफर केली जाऊ शकते. यात 4.14 kWh, 8.2 kWh आणि 12.42 kWh कॅनसह 3 बॅटरी पॅक पर्याय मिळतील. बॅटरी रेंजबद्दल बोलायचे झाले तर ही कार एका चार्जवर 63 किलोमीटर, 123 किलोमीटर आणि 192 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. असं असलं तरी हिंदुस्थानात ही कार लॉन्च होणार की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगामी काळात या नवीन मॉडेलबाबत अधिकृत अपडेट्स मिळतील, अशी अपेक्षा आहे.

डिझाइनच्या बाबतीत, नवीन लिगियर मिनी इलेक्ट्रिक कार लहान असेल, ती मोपेड डिझाइनमध्ये येऊ शकते. या EV ची लांबी 2958mm, रुंदी 1499mm आणि उंची 1541mm असू शकते. युरोपियन मॉडेलवर आधारित या ईव्हीमध्ये फक्त दोन दरवाजे दिसणार आहेत. यामध्ये 12 ते 13 इंची व्हील्स मिळू शकतात.

Ligier Mini EV चा आतील भाग स्पोर्टी असेल. 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पॉवर स्टीयरिंग, हिट ड्रायव्हर सीटसह ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कॉर्नर एसी व्हेंट्स यासारखे फीचर्स यात मिळू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग? संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग?
मंत्रि‍पदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष...
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक ?
मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा झालेला सामना, हल्लेखोराचं वर्णन समोर
Saif Ali Khan Attack : वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर? 10 दिवसांपूर्वी काय घडलं, सैफ प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर
सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस करत आहेत ‘या’ गोष्टींचा तपास, जाणून व्हाल हैराण
Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण….
Saif Ali Khan याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कोणाला बसणार मोठा फटका, होणार कोट्यवधींचं नुकसान?