Kho Kho World Cup – हिंदुस्थानी महिलांचा मलेशियावर 80 गुणांचा शानदार विजय, रेश्मा राठोड सामन्याची मानकरी

Kho Kho World Cup  – हिंदुस्थानी महिलांचा मलेशियावर 80 गुणांचा शानदार विजय, रेश्मा राठोड सामन्याची मानकरी

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघांने शतकी गुणांच्या हॅट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवताना प्रत्येक सामन्यात गुणांची लयलूट केली. आजच्या मलेशिया विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 4 ड्रीम रन मिळवत संघाला संरक्षणात सुध्दा मजबूत स्थिती मिळवून दिली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाने त्यांच्या अप्रतिम ड्रीम रनने सामन्याची सुरुवात केली. मध्यंतराला भारताने 44-06 अशी 38 गुणांची आघाडी घेत आपण पुन्हा एकदा गुणांची लयलूट करू असा जणू इशाराच दिला. गेल्या दोन सामन्यात भारताने 175 व 100 गुण मिळवत एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला होता. आज सुध्दा भारताने गुणांची शंभरी गाठत विजयासह शतकी गुणांची हॅट्रिक केली. भारताने हा सामना 100-20 असा 80 गुणांनी जिंकला.

या सामन्यात हिंदुस्थानी संघाने सामन्याची सुरुवात बचावातील मजबूत कामगिरीसह केली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाच्या ड्रीम रनने सामन्याचा स्वरूप पालटवले. पहिल्या टर्नमध्ये 5 मिनिटे 50 सेकंद बचाव केल्यानंतर सामन्याचा पहिला डाव 6-6 अशा बरोबरीत संपला. त्यानंतर प्रियांका, नीतू आणि मीनू यांनी पहिल्या डावाच्या शेवटी शानदार कामगिरी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला.

दुसऱ्या टर्नमध्ये खेळाच्या फक्त 27 व्या सेकंदाला मलेशियाच्या पहिल्या गटातील सर्व खेळाडूंना बाद करण्यात आले. यामुळे हिंदुस्थानी संघाला मोठा आघाडी घेण्यासाठी संधी मिळाली. मोनिका आणि वझीर निर्मला भाटी यांनी आक्रमणात संघाला प्रचंड बळ दिले. मलेशियाच्या संघासाठी एंग झी यी आणि लक्षिता विजय यांनी संघाला प्रतिकाराची संधी मिळवून दिली. मलेशियाला ड्रीम रन साध्य करण्याची संधी मिळाली होती, पण 1 मिनिट 4 सेकंदांनी ते कमी पडले.

तिसऱ्या टर्नमध्ये सुभाष्री सिंगने भारतासाठी आणखी एक ड्रीम रन मिळवला. या डावात हिंदुस्थानी संघाने 4 मिनिटे 42 सेकंद शानदार संरक्षण केले. ज्यामुळे अंतिम टर्नसाठी संघाने मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या टर्ननंतर स्कोअर 48-20 असा होता.
चौथा डावही हिंदुस्थानी संघासाठी आक्रमण करताना तितकाच प्रभावी ठरला. सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवत हिंदुस्थानी संघाने 80 गुणांच्या फरकाने मलेशियाला पराभूत केले.

सामन्याचे पुरस्कार:
• सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: एंग झी यी
• सर्वोत्कृष्ट बचावपटू: मोनिका
• सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: रेश्मा राठोड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना? मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या...
नशिबवान पिढीच्या नशिबात महाकुंभमेळा! 144 वर्षांनी योग, देव-दानवांच्या युद्धावेळी….
लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, 11 जणांना घेतला चावा
सख्या तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून
चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक
सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्वीट, म्हणाली, हे तर आता….
‘सैफ यांच्या लहान मुलाकडे जात होता हल्लेखोर तेव्हाच…’, रात्री 2 वाजता घरात काय घडले, पोलिसांना केअरटेकरने सांगितली संपूर्ण घटना