नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्‍याने संपवलं जीवन

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होकर्णा येथील शेतकर्‍याने संपवलं जीवन

होकर्णा (ता. जळकोट) येथील तरुण व अल्पभूधारक शेतकरी नागनाथ व्यंकटी बेल्लाळे (वय 35 वर्षे) यांनी कर्जबाजारीपणा व सततची नापिकी याला वैतागून वैफल्यग्रस्त होऊन 10 जानेवारी रोजी शेतातील तण नाश करण्यासाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू होते. पण अखेर काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कधी नापिकी तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती साथ देत नव्हती. त्यातच लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज व बचत गटाचे कर्ज डोईवर होते. ते फिटत नसल्याची चिंता व कसे जगायचे? हा सवाल नागनाथ व्यंकटी बेल्लाळे यांना सातत्याने छळत होता. त्यामुळे 10 जानेवारी रोजी त्यांनी शेताकरिता आणलेले तणनाशक विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय, जळकोट येथे उपचारासाठी त्यांना दाखल केले. मात्र जास्त प्रमाणात औषध घेतल्याचे निदर्शनास आल्यावर पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचारा दरम्यान 16 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने संसार उघड्यावर आला असून, त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने पंचनामा व योग्य ती कारवाही करून तात्काळ शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग? संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग?
मंत्रि‍पदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष...
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक ?
मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा झालेला सामना, हल्लेखोराचं वर्णन समोर
Saif Ali Khan Attack : वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर? 10 दिवसांपूर्वी काय घडलं, सैफ प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर
सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस करत आहेत ‘या’ गोष्टींचा तपास, जाणून व्हाल हैराण
Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण….
Saif Ali Khan याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कोणाला बसणार मोठा फटका, होणार कोट्यवधींचं नुकसान?