सत्ताधाऱ्यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा
मुंबईतील पवई येथील मराठी शाळेला बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या शाळेतील एक भिंत पडली म्हणून शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून शाळेतील विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत पाठवण्यास सांगण्यात आले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय.
आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय.
‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन… pic.twitter.com/sdlyyutSxf— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 16, 2025
”मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरू केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List