Solapur: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे निधन
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली.
सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले
महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List