गुजरातमधून तडीपार झाल्यावर अमित शहांनी आश्रयासाठी बाळासाहेबांना विनंती केली होती, शरद पवार यांनी इतिहासच काढला

गुजरातमधून तडीपार झाल्यावर अमित शहांनी आश्रयासाठी बाळासाहेबांना विनंती केली होती, शरद पवार यांनी इतिहासच काढला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी यावेळी गुजरातमधील पूर्वीच्या नेत्यांची उदाहरणं दिली. शिर्डीत रविवारी भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासक यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्यानंतर एक अत्यंत प्रामाणिक आणि संपूर्ण देशातील राज्यांना एकत्रित ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी ज्यांनी केली ते सरदार पटेल यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. सरदार पटेल यांच्यानंतर उत्तर प्रदेशातून पंडित गोविंद वल्लभ पंत आणि महाराष्ट्रातून यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्यासाठी या थोर देशभक्तांनी मोलाचं काम केलं. आपलं शेजारी राज्य गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी एक राज्य होतं. गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई जशुभाई हे अतिश कर्तबगार स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिले होते. माधव सिंह सोलंकी, चिमणभाई पटेल, अशी अनेक नावं सांगता येतील. हे गुजरातने उत्तम प्रशासक देशाला दिले. ही जी नावं आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून कधी तडीपार केलेलं नव्हतं. तडीपार न केलेले आणि गृहखातं आणि गुजरातमधून योगदान देणाऱ्या नेत्यांची मला आज आठवण येते. देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषणातून काही विधानं केली. मला वाटतं त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं, असे सांगत शरद पवार यांनी अमित शहांना टोला लगावला.

1978 सालापासून माझी आठवण त्यांना झाली. आणि 1958 पासून मी राजकारणात काय केलं याचा उल्लेख त्यांनी केला. 1978 ला म्हणजे आज जवळपास 40 वर्षे होऊन गेले. त्यावेळी हे टीका करणारे कुठे होते, हे मला माहिती नाही. 1978 मध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, अकोल्याच्या डॉ. प्रमिलाताई टोपो असे अनेक कर्तृत्वान जनसंघाचे लोक माझ्या मंत्रीमंडळात होते. 1978 चे पुलोद सरकारची माहिती घेतली तर याती सर्वांनी महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. तसेच वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी संघात राहून सर्व कामात सहकार्य केलं. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने 1978 च्या काळात उभी केली. नंतरच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते. पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता. उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, त्यावेळचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणीसाहेब यांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. अटलजी कर्तृत्वान लोक होते. पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला. त्यावेळी देशातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला गेला की भूकंप, अतिवृष्टी, महापूर याची एक निती देशात ठरवली गेली पाहिजे. देशाचं डिजास्टर प्लॅनिंग हे करण्याचं संबंधिचं काम शरद पवार यांच्यावर सोपवावं. मी विरोधी पक्षात असताना अटलजींनी मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सोपवलं. ही पार्श्वभूमी भाजप नेत्यांना आहे. हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलिकडे जी काही भाषणं दिली आहेत. माझ्याबद्दल आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही उल्लेख केले. यावर भाष्य न केलेलं बरं. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, यापेक्षा अधिक बोलण्याची आवश्यकत नाही, असे शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी जी काय भूमिका घेतली ही तुम्ही पाहिली. उद्धव ठाकरेही त्यावर त्यांचं मत सांगतील. ज्यावेळेला ते गुजरातमध्ये राहूही शकत नव्हते, त्यांना मुंबईत आश्रय देण्यात आला होता. त्यावेळी बाळासाहेबांच्या घरी जाऊन यासंदर्भात सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. याच्याबद्दल अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील. पण दुर्दैवाने, एकंदर किती पातळी घसरली हे सांगायाला ही पुरेशी उदाहरणं आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्याची नोंद त्यांच्या पक्षातही किती घेतील, याव भाष्य न केलेलं बरं, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री