कोटय़वधींची संपत्ती… वॉरेन बफे यांचा वारसदार ठरला
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचं ठरवलंय. त्यानुसार त्यांची सर्व मालमत्ता एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली जाईल. त्याचे व्यवस्थापन त्यांची मुले सुझी, हॉवी आणि पीटर करतील. बिल गेट्स फाऊंडेशनला मात्र काहीही मिळणार नाही. वॉरेन बफे ख्यातनाम गुंतवणूकदार आहेत. ते बर्कशायर हॅथवेचे सीईओ आहेत. 94 वर्षीय बफे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय की, त्यांची उरलेली सर्व संपत्ती एका ट्रस्टला दिली जाईल, जी संयुक्तपणे त्यांची तीन मुले चालवतील. पैशांचा वापर कसा करायचा, हे त्यांची मुले ठरवतील. ट्रस्ट आपल्या हिशोबाने काम करेल. वॉरेन बफे यांनी मुलांना कामासंदर्भात काही सूचनाही दिल्या आहेत. आपल्या मुलांवर विश्वास दाखवत वॉरेन बफे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. बफे यांची 10 लाख कोटींहून अधिक संपत्ती आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला यापुढे एकही पैसा न देण्याचा वॉरेन बफे यांनी निर्णय घेतला आहे. 2006 पासून बफे यांनी गेट्स फाऊंडेशनला 39 अब्ज डॉलर देणगी दिलेली आहे. मात्र आता गेट्स फाऊंडेशनला काहीही मिळणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List