अटल सेतूवर गाड्यांची संख्या रोडावली, अव्वाच्या सव्वा टोलमुळे चालकांनी फिरवली पाठ
अटल सेतूचे लोकार्पण होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण या मार्गावरील वाहनांची संख्या रोडावली आहे. अटल सेतूवर दिवसाला 40 हजार गाड्या धावतील अशी अपेक्षा सरकारने केली होती. पण या मार्गावर दिवसाला 22 हजार 689 वाहनं धावत आहेत.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. 13 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतू या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. 22 किमी लांब असलेल्या या सागरी सेतूनवरून दिवसाला 40 हजार गाड्या धावतील अशी सरकारची अपेक्षा होती. या वर एमएमआरडीए आणि जपान इंटरनॅशनल एजन्सीने एक अभ्यास केला आहे.
एमएमआरडीए ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याऱ्या या सेतूवरून गेल्या वर्षभरात 83 लाख गाड्या गेल्या आहेत. या सेतूवर सर्वाधिक गाड्या 14 जानेवारी 2024 रोजी गेल्या होत्या. नुकतंच या सेतूचे लोकार्पण झाले होते तेव्हा या दिवशी 61 हजार 807 गाड्या या सेतूवरून गेल्या होत्या.
या मार्गावर आकारला जाणारा अव्वाच्या सव्वा टोलमुळे वाहन चालकांनी या मार्गावर पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूने प्रवास करण्यासाठी 200 ते 250 रुपये टोल आकारला जातो. तर रिटर्न प्रवासासाठी 300 रुपये टोल भरावा लागतो. दिवसाचा पास 500 रुपये तर महिन्याचा पास हा 10 हजार रुपये इतका आहे.
तर दुसरीकडे मुंबई आणि नवी मुंबईवर असलेल्या वाशी टोलनाक्यावरू चालक प्रवास करतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने काही टोल नाके बंद केले होते. त्यात वाशी टोलनाक्याचाही समावेश होता. अटल सेतूवरून टोल देण्यापेक्षा वाशी टोल नाक्याचा मार्ग वाहनचालकांनी निवडला आहे.
मुंबईत आणखी काही मार्गाचे काम बाकी आहे. ही कामं पूर्ण झाल्यावर गाड्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. वरळी-शिवडी इलेव्हेटे मार्ग आणि वरळी वांद्रे सेतू हे मार्ग अटल सेतूशी जोडले जातील. त्यानंतर चालकांचे 5 ते 10 मिनिटे वाचतील असा दावा केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List