कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री
कुंभमेळ्याच्या योजनेबद्दल स्टीव्ह जॉब्सच्या पत्राची तब्बल 4.32 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. 1974 मध्ये लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सच्या कुंभमेळ्यासाठी हिंदुस्थानला भेट देण्याच्या योजनांची रूपरेषा होती. त्या पत्राचा बोनहॅम्सने त्याचा लिलाव केला. त्यात त्याला $500.312 ( सुमारे 4.32 कोटी) ला केला होता.
दिवंगत स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स सध्या 2025 च्या महाकुंभमेळ्यासाठी भारतात आहेत. तिथे त्यांना “कमला” हे नाव देण्यात आले आहे. स्टीव्ह जॉब्सचे हे हस्तलिखित पत्र चर्चेत आहे. 1974 मध्ये लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सच्या कुंभमेळ्यासाठी योजनेची रूपरेषा आहे. स्टीव्ह जॉब्सच्या 19 व्या वाढदिवसाच्या फक्त एक दिवस आधी पोस्टमार्क केलेले हे पत्र त्यांचे बालपणीचे मित्र टिम ब्राउन यांना उद्देशून आहे. त्यांच्या आध्यात्मिक आणि आत्मनिरीक्षणात्मक बाजूची एक दुर्मिळ झलक दाखवते. त्यात, जॉब्स झेन बौद्ध धर्माचे प्रतिबिंबित करतात आणि कुंभमेळ्यासाठी भारत भेट देण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.
कुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचा आपला हेतू व्यक्त करताना ते म्हणतात की, मला एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हिंदुस्थानात जायचे आहे. मी मार्चमध्ये कधीतरी निघेन, अद्याप निश्चित नाही. तसेच त्या पत्रावर त्यांनी शांती, स्टीव्ह जॉब्स असेही लिहिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List