भाजीपाला दरातील चढउतारामुळे शेतकरी हतबल, कोबी तीन रुपये किलो;  पिकावर फिरवला नांगर

भाजीपाला दरातील चढउतारामुळे शेतकरी हतबल, कोबी तीन रुपये किलो;  पिकावर फिरवला नांगर

संतोष नाईक, गडहिंग्लज

दिवस-रात्र घाम गाळून, लाखो रुपये खर्च करून पिकविलेल्या भाजीपाल्याला घाऊक बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. घाऊक बाजारात कोबीला तीन रुपये किलो दर मिळाल्याने गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ येथील कुमार पाटील या शेतकऱयाने आपल्या एक एकरातील कोबी पिकावर रोटर फिरविला. भाजीपाला दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची होणारी बिकट अवस्था या घटनेने समोर आली आहे.

खणदाळ या गावातील कुमार पाटील या शेतकऱयाने एक एकर शेतीत चाळीस हजार रुपये खर्च करून कोबी रोपाची लागवड केली होती. 80 दिवसांनंतर हे पीक काढणीला आल्यानंतर त्यांनी काढणी करून यातील दहा पोती कोबी कोल्हापूर येथील घाऊक बाजारपेठेत पाठवले होते. मात्र, या ठिकाणी कोबीची आवक जास्त झाल्याने सौदा झाला नाही. त्यामुळे पाठवलेला कोबी आहे तसा पुन्हा परत आला. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील संकेश्वर घाऊक बाजारात भाजी पाठवली तेथेही हीच परिस्थिती. दराची घसरण झाल्याने किलोला तीन रुपये एवढा कवडीमोल दर मिळाला. केवळ सहाशे रुपयांचीच भाजी त्यांनी विकली. चाळीस हजार रुपये खर्च करून केलेल्या शेतीतून केवळ सहाशे रुपये मिळविण्याची वेळ कुमार पाटील यांच्यावर आली. भाजीपाल्याच्या दरातील चढ-उतारामुळे अखेर हताश होऊन कुमार पाटील यांनी कोबीच्या संपूर्ण पिकावरच रोटर मशीन फिरवत ते नष्ट केले. भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, या आशेने केलेल्या कोबी पिकावर यंत्र फिरवून त्याचे खत करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं!

कोबीला दोन आठवड्यांपूर्वी बाजारात पंचवीस रुपये इतका दर होता. मात्र, त्यावेळी माझ्या शेतातील पीक काढणीला आलेले नव्हते. आता काढणी केली आणि दर एकदमच घसरला. किलोला तीन रुपये दर आहे. संकेश्वर, कोल्हापूर बाजारपेठांमध्ये भाजी पाठवली; परंतु काहीच उपयोग झाला नाही. दरच मिळत नसल्याने कोबी पिकावर रोटर फिरवला. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे; अन्यथा शेतकऱ्यांना जगणे मुश्कील होईल.– कुमार पाटील (शेतकरी, खणदाळ)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले? …तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती....
जया बच्चन हजारोंसमोर सुनेबद्दल असं काही बोलल्या,ते ऐकून ऐश्वर्याला रडू आलं, व्हिडीओ व्हायरल
कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल
Kho-Kho World Cup 2025 – हिंदुस्थानच्या मुलींची कमाल, दक्षिण कोरियाचा 157 गुणांनी उडवला धुव्वा
Crime News – मृत्युनंतर काय होतं…गूगलवर सर्च करत नववीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप
मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली